Jalgaon Land Records : जमीन मोजणी होणार सुलभ.. तंटे मिटून येणार पारदर्शकता

Jalgaon Land Records : भूखंडाची तत्काळ मोजणी करता येवून जिल्ह्यातील विविध‎ शासकीय प्रकल्पांसाठी आवश्यक‎ असणाऱ्या जमीन अधिग्रहणाची‎ प्रक्रियादेखील अधिक जलदगतीने‎ होणार आहे.
Guardian Minister Gulabrao Patil while distributing rover unit for land records department.
Guardian Minister Gulabrao Patil while distributing rover unit for land records department.esakal

Jalgaon Land Records : भूमिअभिलेख विभागाला रोवर युनिट मशीन प्राप्त झाले आहेत. त्यामुळे शेत जमीन मोजणी तसेच गावठाण भूखंड वाटप, पुनर्वसन भूखंड वाटप याद्वारे दिल्या जाणाऱ्या भूखंडाची तत्काळ मोजणी करता येवून जिल्ह्यातील विविध‎ शासकीय प्रकल्पांसाठी आवश्यक‎ असणाऱ्या जमीन अधिग्रहणाची‎ प्रक्रियादेखील अधिक जलदगतीने‎ होणार आहे.

बांधावरून भावकीचे आपापसात वाद सुरू असतात.(Jalgaon Land records department gets rover unit machine to make land counting easier)

परंतु आता या यंत्रामुळे जमिनीचे मोजमाप करण्यासाठी लागणारा वेळ आता लागणार नाही. भूमिअभिलेख विभागाला प्राप्त झालेल्या या रोवर युनिट मशीनमुळे जमीन मोजणी अधिक जलदगतीने‎ होणार असून शेतकऱ्यांना व प्रशासनाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी रोव्हर मशीन वाटपा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हा भूमीअभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक एम.पी. मगर, उपअधीक्षक, एरंडोल बी. सी. अहिरे,नगर भुमापन अधिकारी पी. एस.पाटील उपस्थित होते.

मशीनसाठी दोन कोटींची तरतूद

गुलाबराव पाटील यांनी यावर्षी प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे पंधरा रोवर मशीन वाटप करण्यात आल्या. यासाठी १ कोटी ८० लक्ष निधीची जिल्हा नियोज मधून तरतूद करण्यात आली, तर मागील वर्षी १२‎ आधुनिक जमीन मोजणी यंत्रे‎ भूमिअभिलेख कार्यालयास‎ देण्यात आली आहेत. यासाठी १ कोटी‎ २० लाख निधी खर्च केले गेला होता.

असे चालते काम

भूमिअभिलेख कार्यालयातर्फे‎ जिल्ह्यातील सर्व जमिनींच्या‎ अभिलेख्यांचे जतन करण्यासह‎ नागरिकांच्या मागणीसह त्यांच्या‎ जमिनींचे मापन करण्यात येते. यात‎ हद्दी निश्‍चित केल्यानंतर बिनशेती,‎ ले-आऊट, भूसंपादन, भूप्रदान‎ आदी प्रक्रियांच्या मदतीने अभिलेख‎ तयार केले जातात. आजवर या सर्व‎ प्रक्रिया प्लेन टेबल या पारंपरिक‎ पद्धतीत पार पाडल्या जातात.‎ (latest marathi news)

Guardian Minister Gulabrao Patil while distributing rover unit for land records department.
Jalgaon Gulabrao Patil : निराधारांना आधार देण्यासाठी शासन कटिबद्ध : पालकमंत्री पाटील

यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ‎ तर लागतेच पण अनेक ठिकाणी‎ झाडी-झुडपी, डोंगरदऱ्या यामुळे‎ जमीन मोजणीत मोठ्या अडचणी‎ येत होत्या. रोवर यंत्रांमुळे जिल्ह्यातील विविध‎ शासकीय प्रकल्पांसाठी आवश्यक‎ असणाऱ्या जमीन अधिग्रहणाची‎ प्रक्रियादेखील अधिक जलदगतीने‎ होणार आहे

अचूकता, पारदर्शकता येणार

या मशीनद्वारे अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करता येते. अचूकता आणि पारदर्शकता ही या यंत्राची वैशिष्ट्ये आहेत. या मशिनच्या सहाय्याने मोजणी कशी करायची याचे प्रशिक्षण दिले गेले आहे. रोवर मशीनमुळे तासांमध्ये किंवा काही मिनिटातच या मशीनद्वारे जमिनीची मोजणी करता येते.

प्रास्ताविकात जिल्हा भूमीअभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक एम.पी. मगर यांनी योजनेची माहिती विशद करून होणारे फायदे सविस्तरपणे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उप अधीक्षक, एरंडोल बी. सी. अहिरे यांनी केले. तर आभार पी. एस.पाटील, नगर भुमापन अधिकारी यांनी मानले.

Guardian Minister Gulabrao Patil while distributing rover unit for land records department.
Jalgaon Lok Sabha Election News 2024 : रक्षा खडसेंच्या उमेदवारीने ‘राष्ट्रवादी’समोर पेच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com