Jalgaon Lok Sabah Constituency : रक्षा खडसेंची भक्कम तयारी अन्‌ नवख्या श्रीराम पाटलांचा संघर्ष; मुक्ताईनगरातील स्थिती

Lok Sabah Constituency : रक्षा खडसेंनी निवडणुकीआधीच केलेली तयारी यामुळे भाजपची बाजू भक्कम झाल्याचे दिसते.
raksha khadse and shriram patil
raksha khadse and shriram patilesakal

Jalgaon Lok Sabah Constituency : रावेर लोकसभा क्षेत्रातील अत्यंत संवेदनशील व महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुक्ताईनगर मतदारसंघात ऐन निवडणुकीच्या वेळी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या भाजपतील प्रवेशाची तयारी, रक्षा खडसेंनी निवडणुकीआधीच केलेली तयारी यामुळे भाजपची बाजू भक्कम झाल्याचे दिसते. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील हे नवखे असल्याने त्यांना संघर्ष करावा लागेल, अशी चिन्हे आहेत. ()

रावेर लोकसभा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण मतदारसंघ म्हणून मुक्ताईनगरचा उल्लेख केला जातो. किंबहुना गेल्या साडेतीन दशकांहून अधिक काळ या मतदारसंघात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचे वर्चस्व राहिल्यानेही राजकीयदृष्ट्या राज्यभरात या गावाची ओळख निर्माण झालीय.

रक्षा खडसेंची पूर्वतयारी

खासदार रक्षा खडसे यांनी निवडणुकीआधी तयारी केल्याने प्रचाराचा मोठा टप्पा गाठला आहे. गेल्या काळात एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेल्याने याठिकाणी भाजपमध्ये पोकळी निर्माण झाली होती. मात्र, रक्षा खडसे यांनी पक्ष सोडला नाही. उलट, त्या पक्षाची एकनिष्ठ राहून त्यांनी पक्षसंघटनेकडेही लक्ष दिले.

रक्षा खडसे यांचा दहा वर्षांचा अनुभव, या कार्यकाळात त्यांनी केलेली विकासकामे आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू दिसून येतात. त्यामुळे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात गेल्या वेळेप्रमाणे यावेळीही मतदार भाजपच्या पाठिशी उभे राहतील, असे दिसते. ( ( latest political news )

raksha khadse and shriram patil
Jalgaon Lok Sabha Constituency : ‘मोदी टू बूथ’ अभियानाद्वारे मतदारांपर्यंत पोहोचतोय! अमोल जावळे

श्रीराम पाटील नवखे

तर त्या तुलनेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील नवखे असून त्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यात त्यांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक परिश्रमांची गरज आहे. श्रीराम पाटील यांची धुरा पूर्णपणे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील आघाडीच्या कार्यकर्त्यांवर आहे. राष्ट्रवादीच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेही पाटील यांच्याप्रचारात आक्रमकपणे उतरल्या आहेत. पाटलांकडून रक्षा खडसेंनी केलेल्या कामांचा मुद्दा उपस्थित केला जात असून रक्षा खडसेही या कामांवरच मतदारांसमोर कौल मागत आहे.

आमदारही सक्रिय

खडसे कुटुंबात उमेदवारी मिळाल्याने खडसेंचे कट्टर विरोधक आमदार चंद्रकांत पाटील यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच भेट घेतली.. या भेटीत त्यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. बावनकुळेंची शिष्टाई कामी येत असल्याचे चिन्ह असून आमदार पाटील याठिकाणी सक्रिय झाले आहेत.

खडसेंचे ‘कमबॅक’

गेल्या अडीच वर्षांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असलेले माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी नुकतीच भाजपत प्रवेश करीत असल्याची घोषणा केली. त्यांचा प्रवेश निश्‍चित असून, प्रवेशाच्या घोषणेची औपचारिकता तेवढी बाकी आहे.. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पवार गटाचा राजीनामाही दिला आहे.. रक्षा खडसेंच्या प्रचारात ते आता थेट उतरले असून त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साह आहे.

जातीची गणितं निष्प्रभ ठरणार

मुक्ताईनगर मतदारसंघात मराठा मतदार एकत्र होऊन एकतर्फी मतदान होईल, असे चित्र रंगवले जात आहे. त्यातून मराठा, लेवा व अन्य ओबीसी असे जातीय समीकरणही मांडले जातेय.. मात्र, या मतदारसंघात खडसेंनी जाती- धर्मापलिकडे जात सर्वांनाच मदत केली आहे. विकासकामांच्या बाबतही दुजाभाव ठेवलेला नाही. त्यामुळे जातीची गणितं याठिकाणी निष्प्रभ ठरतील, असा दावा केला जात आहे.

raksha khadse and shriram patil
Jalgaon Lok Sabha Constituency : संमिश्र कौलाचा इतिहास, आव्हान मताधिक्क्याचे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com