Jalgaon Lok Sabha Constituency : एकनाथ खडसे- फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार? भुसावळात आज सभा

Lok Sabha Constituency : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाची औपचारिकता अद्याप पूर्ण झालेली नसताना ते स्नुषा व भाजप उमेदवार रक्षा खडसेंच्या प्रचारात उतरले आहेत.
Eknath Khadse- Fadnavis
Eknath Khadse- Fadnavisesakal

Jalgaon Lok Sabha Constituency : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाची औपचारिकता अद्याप पूर्ण झालेली नसताना ते स्नुषा व भाजप उमेदवार रक्षा खडसेंच्या प्रचारात उतरले आहेत. अशातच रक्षा खडसेंच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी (ता.७) भुसावळ येथे सभा होत असून या सभेच्या निमित्ताने हे जुने सहकारी एकाच व्यासपीठावर येतात का, याबद्दल जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून आहे. ()

अडिच वर्षांपूर्वी भाजपतील राज्य नेतृत्वावर, विशेषत: देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत एकनाथ खडसेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसेंनीही त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत राष्ट्रवादी गाठली. गेल्या वर्षी खडसेंना विधानपरिषदेची आमदारकीही बहाल करण्यात आली. मात्र, वर्षभरानंतर पुन्हा राजकीय स्थिती बदलली.

खडसेंच्या भाजप प्रवेशाची भूमिका

काही महिन्यांपूर्वी रावेर मतदारसंघाची जागा लढविण्याची घोषणा खडसेंनी केली. मात्र, नंतर त्यांना हृदयविकाराचा त्रास झाल्याने त्यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी या निवडणुकीतून प्रकृतीचे कारण पुढे करत माघार घेतली. आणि गेल्या काही दिवसांत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेत भाजपत प्रवेश करत असल्याची भूमिका जाहीर केली. ( jalgaon political news )

Eknath Khadse- Fadnavis
Jalgaon Lok Sabha Constituency : स्थानिक मतभेद विसरुन जोमाने कामाला लागा : चंद्रशेखर बावनकुळे

राज्यातील नेतृत्वाचा विरोध?

खडसेंनी भाजपत येण्याची भूमिका जाहीर केली, केंद्रीय नेतृत्वानेही त्यास मान्यता दिली. मात्र, राज्यातील नेतृत्वाचा त्यास विरोध असल्याचे बोलले जात आहे. अर्थात, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘मोदींच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून जो कुणी येत असेल त्याचे स्वागत’ अशी भूमिका घेतली. मात्र, तरीही खडसेंचा प्रवेश अद्याप होऊ शकलेला नाही.

खडसे सुनेच्या प्रचारात

यादरम्यान पक्षानेही सर्वेक्षणाचा आधार सांगत त्यांच्या स्नुषा व खासदार रक्षा खडसेंवर तिसऱ्यांदा विश्‍वास दर्शवत उमेदवारी दिली. खडसे भाजपच्या उंबरठ्यावर उभे असून केवळ प्रवेश जाहीर करण्याची औपचारिकता शिल्लक असताना ते पक्षाच्या उमेदवार व त्यांच्या स्नुषा यांच्या थेट प्रचारात सहभागी झाले. तिकडे गिरीश महाजनांनीही ‘खडसेंनी आधी राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, मग प्रचार करावा’ असे म्हटले.

बावनकुळेंनंतर फडणवीस.

या राजकीय घडामोडी घडत असताना गेल्या आठवड्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुक्ताईनगरला येऊन गेले. मात्र, खडसेंशी त्यांची भेट झाली नाही. आणि अशातच आता फडणवीसांची रक्षा खडसेंच्या प्रचारार्थ भुसावळला सभा होत आहे. त्यामुळे या सभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा खडसेंच्या प्रवेशासंदर्भात चर्चा सुरु होऊन खडसे या सभेला व्यासपीठावर जातील काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्यासाठी उद्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Eknath Khadse- Fadnavis
Jalgaon Lok Sabha Constituency : संमिश्र कौलाचा इतिहास, आव्हान मताधिक्क्याचे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com