Jalgaon Lok Sabha Constituency : रक्षा खडसे, वाणी, ॲड. तिवारींनी घेतले अर्ज; पहिल्याच दिवशी एकही अर्ज दाखल नाही

Jalgaon News : जळगाव व रावेर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी गुरुवार (ता. १८)पासून सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी २६ उमेदवारांनी ७३ उमेदवारी अर्ज घेतले.
Application
Application esakal

Jalgaon News : जळगाव व रावेर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी गुरुवार (ता. १८)पासून सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी २६ उमेदवारांनी ७३ उमेदवारी अर्ज घेतले. मात्र, एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. पहिल्याच दिवशी जळगाव लोकसभेसाठी १३ उमेदवारांनी २९ अर्ज, तर रावेरसाठी १३ उमेदवारांनी ४४ अर्ज घेतले. (Jalgaon Lok Sabha Constituency)

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सूचना गुरुवारी जाहीर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज देणे, व स्वीकारण्यची प्रक्रिया सुरू झाली. उमेदवारी अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही. फक्त निश्चित केलेली अनामत रक्कम भरावी लागणार आहे.

खुल्या वर्गासाठी ही रक्कम २५ हजार रुपये असून, राखीव प्रवर्गासाठी साडेबारा हजार रुपये आहे, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. जळगाव मतदारसंघासाठी अर्ज घेतलेल्यांची नावे व कंसात गावाचे नाव, अर्जांची संख्या अशी : गणेश कौतिकराव ढेंगे (जळगाव, अपक्ष २ अर्ज), संजय एकनाथ माळी (धरणगाव, अपक्ष २).

फोटोग्राफर डी. डी. वाणी (रावेर, अपक्ष, २), भरत पंढरीनाथ सपकाळे (बहुजन समाज पार्टी, ३), ललित गौरीशंकर शर्मा (अपक्ष, ४), ललित शर्मा (जळगाव) यांनी सुरेश पांडुरंग पाटील (पाचोरा) यांच्यासाठी (हिंदुस्तान जनता पार्टी, ४), ईश्वर दयाराम मोरे (सैनिक समाज पार्टी, १), ॲड. गोविंद जानकीराम तिवारी (हिंदू महासभा, २).

संदीप युवराज पाटील (अमळनेर, अपक्ष, २), संदीप युवराज पाटील यांनी श्रीमती अश्विनी गोरख पाटील (अमळनेर) यांच्यासाठी (अपक्ष, २), योगेश सुखदेवराव बाविस्कर (जळगाव) यांनी महेंद्र देवराम कोळी यांच्यासाठी (कळमसरा, ता. अमळनेर, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, १), विजय भिमराव निकम (पिंप्राळा हुडको, अपक्ष २), मोहन सोमा जोगी (सबगव्हाण, ता. पारोळा, अपक्ष, २), असे एकूण १३ उमेदवारांनी २९ उमदेवारी अर्ज घेतले आहेत. (latest marathi news)

Application
Jalgaon Lok Sabha Election : प्रा. मनोज पाटील यांच्या प्रवेशामुळे एकनाथ शिंदे गटाची ताकद वाढणार

रावेर लोकसभा मतदारसंघात १३ उमेदवारांनी ४४ अर्ज घेतले. त्यात डी. डी. वाणी (फोटोग्राफर, रावेर, अपक्ष ४ अर्ज), जितेंद्र पांडुरंग पाटील (थोरगव्हाण, ता. यावल, अपक्ष, ४), अमित हरिभाऊ कोलते (मलकापूर, जि. बुलढाणा, अपक्ष, ३), रमेश रंगनाथ साळवे (भुसावळ, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक, ३), शेख राऊत शेख युसुफ (खडका, ता. भुसावळ, अपक्ष, २).

प्रवीण लक्ष्मण टील (मलकापूर, जि. बुलढाणा, अपक्ष २), संजय प्रल्हाद कांडेलकर (भोईवाडा, मुक्ताईनगर, अपक्ष, ४), तुषार किसन राणे (सालबर्डी, ता. मुक्ताईनगर) यांनी खासदार रक्षा निखिल खडसे यांच्यासाठी (भाजप ४), राहुलरॉय अशोक मुळे (किन्ही, ता. जामनेर, अपक्ष, ४).

ॲड. नामदेव पांडुरंग कोळी (असोदा, ता. जळगाव, अखिल भारतीय हिंदू महासभा ४), अब्दुल आरीफ अब्दुल गनी (जाम मोहल्ला, भुसावळ, अपक्ष, ४), गुलाब दयाराम भिल (खडगाव, ता. चोपडा, भारत आदिवासी पार्टी, २), अनिल पितांबर वाघ (जळगाव, अपक्ष, ४), असे एकूण १३ उमेदवारांनी ४४ अर्ज घेतले.

Application
Jalgaon News : दिल्ली दरबारी ऑनलाइन तक्रार अन् विरावलीत धडकले अधिकारी; मृत ‘सीआरपीएफ’ जवानाच्या कुटुंबीयांना मिळाला न्याय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com