Jalgaon Lok Sabha Constituency : एरंडोलमधील प्रचारात आजी- माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

Lok Sabha Constituency : महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी आजी,माजी खासदार व आमदार प्रचारात सक्रीय सहभागी झाले आहेत.
chimanraon patil and dr.satish patil
chimanraon patil and dr.satish patilesakal

Jalgaon Lok Sabha Constituency : जळगाव लोकसभा मतदारसंघातील एरंडोल विधानसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी आजी,माजी खासदार व आमदार प्रचारात सक्रीय सहभागी झाले आहेत. विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार चिमणराव पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ( Reputation of former MLA at stake in Erandol campaign )

लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आजी-माजी आमदारांनी सहा महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी करण्याच्यादृष्टीने नियोजन सुरु केले आहे. एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारात शिवसेनेचे विद्यमान आमदार चिमणराव पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील, माजी खासदार ए. टी.पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील.

युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी, भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा मीनाक्षी पाटील, माजी उपनगराध्यक्षा छाया दाभाडे यांच्यासह महायुतीतील मित्र पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचारात माजीमंत्री डॉ.सतीश पाटील, माजी खासदार उन्मेष पाटील, शिवसेनेच्या उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख डॉ.हर्शल माने, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र देसले यांच्यासह मित्र पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

महायुती आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी प्रचारात सहभागी झाले असले तरी आमदार चिमणराव पाटील आणि माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ मतदारसंघातून मताधिक्य मिळवून देण्यासाठी आमदार चिमणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील व त्यांचे सहकारी मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन मतदारांशी संपर्क साधत आहेत. (latest political news)

chimanraon patil and dr.satish patil
Jalgaon Lok Sabha Constituency : विरोधकांच्या तोंडी विकासाची नव्हे, शिव्यांची भाषा : फडणवीस

सहा महिन्यांनतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतर्फे आमदार चिमणराव पाटील अथवा त्यांचे पुत्र जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील या दोघांपैकी एकाची उमेदवारी निश्‍चित मानली जात असल्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघातील सर्व गावे पिंजून काढली आहेत.

मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्यापेक्षा जास्त मताधिक्य महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांना एरंडोल विधानसभा मतदारसंघातून मिळेल असा विश्वास आमदार चिमणराव पाटील आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचारात त्यांचे काका तथा माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील, उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्शल माने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नाना महाजन यांच्यासह घटक पक्षातील पदाधिकारी सक्रीय सहभागी झाले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे डॉ.सतीश पाटील यांच्यासह डॉ.हर्शल माने आणि जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन हे तिघेही इच्छुक असून त्यांनी विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभाग घेतला आहे. लोकसभेच्या निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीची रंगीत तालिम म्हणून पाहिले जात आहे.

chimanraon patil and dr.satish patil
Jalgaon Lok Sabha Constituency : राष्ट्रवादीचा गड.. पण लोकसभेत चोपड्याची भाजपला साथ; आमदारही होणार सक्रिय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com