Jalgaon Unmesh Patil : उन्मेश पाटील यांचा खासदारकीचा राजीनामा!

Jalgaon News : लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारलेल्या उन्मेश पाटील यांनी बुधवारी मुंबईत मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश करण्याआधी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
Unmesh Patil
Unmesh Patil esakal

Jalgaon News : लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारलेल्या उन्मेश पाटील यांनी बुधवारी मुंबईत मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश करण्याआधी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे त्यांनी मेलद्वारे राजीनामा पाठविला. जळगाव लोकसभा मतदारसंघातून २०१९ मध्ये साडेचार लाखांच्या मताधिक्याने उन्मेश पाटील भाजपचे खासदार म्हणून विजयी झाले होते. (Jalgaon Unmesh Patil)

Unmesh Patil
Jalgaon Water Scarcity : जिल्ह्यात 42 गावांत पाणीटंचाई; जिल्हा प्रशासन टंचाईबाबत अलर्ट

या वेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर ते नाराज होते. या नाराजीतून त्यांची गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्यांशी चर्चा सुरु झाली होती. अखेरीस मंगळवारी (ता.२) त्यांनी मुंबईत संजय राऊत व नंतर उद्धव ठाकरेंची भेट घेत प्रवेशाची भूमिका घेतली. (jalgaon political news)

Unmesh Patil
Jalgaon Loksabha: भाजपचा विद्यमान खासदार ठाकरेंकडून लढणार? लोकसभेचं समीकरण बदलणार?

बुधवारी दुपारी साडेबारा वाजता मातोश्रीवर त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरला. त्याआधी त्यांनी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे पत्र देऊन, तो मंजूर करावा, अशी विनंती केली.

Unmesh Patil
Raver Lok Sabha Constituency : ‘मविआ’कडून 2 दिवसांत उमेदवाराची घोषणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com