Jalgaon Lok Sabha Election : अंतिम यादीत 35 लाखांवर मतदार; 14 एप्रिलला यादी फायनल

Jalgaon News : जळगाव व रावेर लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी रविवारी (ता. १४) फायनल झाली. त्यानुसार आता ३५ लाख २७ हजार ९२९ मतदारसंख्या झाली आहे.
Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha Electionesakal

Jalgaon News : जळगाव व रावेर लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी रविवारी (ता. १४) फायनल झाली. त्यानुसार आता ३५ लाख २७ हजार ९२९ मतदारसंख्या झाली आहे. १ जानेवारी २०२४ ला ३४ लाख ९१ हजार ९८ मतदार संख्या होती. त्यात ३६ हजार ८३१ मतदारांची वाढ झाली आहे. (Jalgaon Lok Sabha Election 35 lakh voters in final list)

महिलांच्या नोंदणीत ३० टक्के वाढ

महिला मतदारांच्या नोंदणीत ३० टक्के वाढ झाली आहे. १ जानेवारीस १६ लाख ७८ हजार ९५६ महिला मतदार होत्या. त्यात आता २० हजार ३२१ ने वाढ झाली आहे. आता महिला मतदार १६ लाख ९९ हजार २७७ आहेत.

तृतीयपंथीय तीनने घटले

जिल्ह्यात १ जानेवारी २०२४ ला १३५ तृतीयपंथीय मतदार होते. मात्र, तीन जण तृतीयपंथीय असल्याचा पुरावा कागदोपत्री सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना तृतीयपंथीय म्हणून न घेता सर्वसामान्य मतदार म्हणून गणले आहे.

दिव्यांग मतदार वाढले

१ जानेवारीस दिव्यांग मतदार १९ हजार २११ होते. त्यात १ हजार ९५९ वाढले आहेत. आता दिव्यांग मतदार २१ हजार १७० झाले आहेत. ८० वयोगटाचे मतदार १ लाख ३ हजार १२९ आहेत. ८५ वर्षांवरील वयोगटातील मतदार ४५ हजार ८०६ आहेत. १०० वर्ष वयोगटातील मतदार ९११ होते. (latest marathi news)

Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon Girish Mahajan : खासदारकीत काम चांगले; मग उमेदवारी का नाही? : गिरीश महाजन

त्यांचा पुन्हा सर्वे केला असता, ४२८ मतदारांचे निधन झाल्याचे आढळले. आता ४८३ मतदार १०० वर्षांवरील आहेत. सर्व्हिस वोटर ८ हजार १६ होते. त्यात २२ ने घट झाली. आता सात हजार ९९४ सर्व्हिस वोटर आहेत.

रावेरचे १, पाचोऱ्यातील २ केंद्रे अतिसंवेदशिल

जिल्ह्यात २०१९ ला लोकसभा निवडणुकीवेळी तीन हजार ६१७ मतदान केंद्रे होती. त्यातील ३६ अतिसंवेदनशील होती. यंदाच्या निवडणुकीत ३६ अतिसंवेदशिल मतदान केंद्रे निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार कमी करून तीनच अतिसंवेदनशील मतदान केंद्रे ठेवली आहेत. यंदा तीन हजार ५८२ मतदान केंद्रे आहेत.

त्यातील तीन हजार ५७९ मतदान केंद्रे संवेदनशील नाहीत, तर ३ केंद्रे अतिसंवेदनशील आहेत. त्यात पाचोरा विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्र क्रमांक १०९ (भडगाव) हे अतिसंवेदनशील आहे. वडगाव जोगे (ता. पाचोरा) येथील २९२ क्रमांकांच्या मतदान केद्रांवर १० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले होते, म्हणून अतिसंवेदनशील, तर रावेरमधील १०६ क्रमांकाचे मतदान केंद्रे अतिसंवेदनशील आहे.

Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon News : बायपास गावाबाहेर, व्यावसायिकांना घरघर; वाहने थांबत नसल्याने खादपदार्थ, शीतपेयांची विक्री मंदावली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com