Jalgaon Lok Sabha Election : यंदा मतदान करणाऱ्यांच्या संख्येत 8 टक्क्यांनी वाढ; दोन्ही मतदारसंघातही वाढ

Lok Sabha Election : जिल्ह्यात सोमवारी (ता. १३) झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्यांची संख्या ७.९१ टक्क्यांनी वाढली आहे.
Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha Electionesakal

Jalgaon Lok Sabha Election : जिल्ह्यात सोमवारी (ता. १३) झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्यांची संख्या ७.९१ टक्क्यांनी वाढली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीतील मतदानाच्या तुलनेत २.३२ टक्के, तर रावेर लोकसभा मतदारसंघात २.८६ टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जळगाव लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी (ता. १४) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. (8 percent increase in number of voters this year )

जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले, की मतदान वाढलेल्या मतदारसंघात वाशिम, वर्धानंतर तिसरा क्रमांक जळगाव जिल्ह्याचा आहे. निवडणूक निरीक्षकांनी जळगाव लोकसभा मतदारसंघातील ३५९ व रावेर लोकसभा मतदारसंघातील ७६ मतदान केंद्रांवरील दप्तर तपासणी केली. त्यात एकही चूक आढळलेली नाही. लोकसभा मतदानादरम्यान एकाही पक्षाने तक्रार केलेली नाही.

आरोग्य सुविधेचा लाभ

जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर असलेल्या आरोग्य सुविधेचा लाभ १५ हजार ६१६ मतदारांनी घेतला. त्यात भुसावळ, मुक्ताईनगर, चाळीसगावमधील अधिक मतदारांचा समावेश आहे.

चार महिलांना पोलिस संरक्षण

जिल्ह्यातील चार महिलांना पोलिस सरंक्षण मतदानासाठी उपलब्ध करून दिले होते. त्या महिलांवर घरगुती अत्याचार होत होता. त्यात चाळीसगावच्या दोन, पाचोरा व जळगाव ग्रामीणमधील प्रत्येकी एक महिलेचा समावेश आहे. त्यांचे कुटुंब त्यांना मतदानापासून प्रवृत्त करीत होते. त्या महिलांना पोलिस बंदोबस्त देऊन त्यांच्याकडून मतदान करवून घेतले. (latest marathi news)

Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha Election : शहरात लोकशाहीच्या उत्सवाचा उत्साह! सकाळपासूनच मतदानासाठी रांगा

महिलांचा चांगला प्रतिसाद

जिल्ह्यात १५० थीमेटिक मतदान केंद्रे होती. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात महिला मतदारांनी मतदानाला चांगला प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील २७ हजार बचत गटांच्या सुमारे २ लाख ७० हजार महिला आहेत. त्यातील २ लाख ४० हजार महिलांनी विविध ठिकाणी एकत्र येत मतदान केले. उत्सवासाठी हा दिवस साजरा केला.

मतदारांवर बक्षिसांचा वर्षाव

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी युवक, महिला, इतर नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने विशेष स्पर्धा ठेवली होती. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी केलेला उत्कष्ट पेहराव, ग्रुपमधील अधिक संख्येने एकत्र येत केलेले मतदान, इतरांना मतदान करण्यासाठी दिलेले प्रोत्साहन, अशाप्रकारचे छायाचित्र काढून जिल्हा प्रशासनाच्या वेबसाईटवर टाकण्यास सांगितले होते, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. रावेर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अकुंश पिनाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत या वेळी उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल असा

*आकर्षक वेशभूषा नवयुवक मतदार इन्स्ट्राग्राम (वयोगट १८-२३) : उमेश राजपूत, अमेय, मोहित सोनी

*आकर्षक वेशभूषा नवयुवती (वयोगट १८-२३) : मयुरी सूर्यवंशी, अक्षय वाघ, धनश्री (dhanashri521)

*आकर्षक मोठा समूह (वयोगट १८-२३) : प्रतीक जैन, गौरव सिनकर, रवींद्र बोरसे

*आकर्षक बेस्ट स्टोरी (खुला गट) : प्रा. शंतनू महाजन (फैजपूर), संजय काशिनाथ कोळी (चोपडा), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (जळगाव) *आकर्षक बेस्ट क्रिएटिव्ह (खुला गट) : अंबिका फोटो स्टुडिओ, ९४.३. माय एफ.एम., भरारी व उडाण संघ (मनपा, जळगाव)

Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha Election 2024 : जळगाव, रावेर लोकसभेच्या मतदानाची जय्यत तयारी! जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

दोन पंचवार्षिकमधील वाढलेली मतदानाची टक्केवारी

जळगाव लोकसभा मतदारसंघ

विधानसभा मतदारसंघ--२०१९ ची मतदान टक्कवारी--२०२४ ची टक्केवारी--फरक

जळगाव शहर--४९.१४--५३.५५--४.४१

जळगाव ग्रामीण--६०.४५--६२.६४--२.१९

अमळनेर--५३.५०--५५.७--२.२०

एरंडोल--५९.३८--६१.८--२.४२

चाळीसगाव--५८.२१--५८.४६--०.२५

पाचोरा--५७.८३--६०.०६--२.२३

एकूण--५६.१६--५८.४८--२.३२

Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha Election : स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेल्या 103 वर्षांच्या आजोबांनी केले मतदान

रावेर लोकसभा मतदारसंघ

विधानसभा मतदारसंघ--२०१९ ची टक्केवारी--२०२४ ची टक्केवारी--फरक

चोपडा--६१.३०--६२.३३--१.०३

रावेर--६५.८२--७०.८१--४.९९

भुसावळ--५२.३९--५७.३८--४.९९

जामनेर--६.०४--६३.३३--३.२९

मुक्ताईनगर--६२.६८--६४.८७--२.१९

मलकापूर--६७.०१--६७.३८--०.३७

एकूण--६१.४--६४.२८--२.८८

Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha Election : ‘होम वोटिंग’द्वारे पहिल्या दिवशी 52 जणांचे मतदान; 2 दिवस चालणार प्रक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com