Jalgaon Lok Sabha Constituency : रावेरला भावजयीविरोधात, बारामतीत नणंदेच्या प्रचारात! मुक्ताईनगरच्या लेकीचे योगदान

Lok Sabha Constituency : यंदाची लोकसभा निवडणूक नात्या-नात्यातील लढती, संबंधांमुळे बरीच गाजली.
Adv. participating in campaign rally with Supriya Sule in the constituency. Rohini Khadse
Adv. participating in campaign rally with Supriya Sule in the constituency. Rohini Khadseesakal

Jalgaon Lok Sabha Constituency : यंदाची लोकसभा निवडणूक नात्या-नात्यातील लढती, संबंधांमुळे बरीच गाजली. त्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली ती नणंद- भावजयीतील बारामतीची लढत अन्‌ रावेरच्या लढतीत भावजयीविरोधात प्रचारात उतरलेली नणंद. राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे यांनी एकीकडे रावेर मतदारसंघात भावजयीच्या विरोधात प्रचार केलेला असताना बारामतीत त्या थेट नणंदेच्या प्रचारात आघाडीवर होत्या. ( is very popular due to relationship fights and relationship )

राज्याच्या राजकारणात सर्वाधिक गाजलेली निवडणूक म्हणून यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा उल्लेख कायमच होईल. या निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये नातेसंबंधांमधील लढतींनी रंगत आणली, तशी काही नात्यांमध्ये अडचणीही निर्माण केल्यात.

सुप्रिया सुळेंचा मतदारसंघात प्रचार अन्‌ राज्यात दौरे

बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेंनी पुन्हा उमेदवारी केली. तर गेल्या वर्षी अजित पवार वेगळे झाल्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पत्नी सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार होत्या. या लढतीत मतदारसंघात केलेली विकासकामे आणि पक्षाचे ध्येय धोरणे मतदारांपर्यंत पोहचवत बारामती लोकसभा मतदारसंघात स्वतःचा प्रचार सांभाळून त्यांनी इतर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ प्रचार सभा घेतल्या. त्यांना पक्षातील इतर महिला नेत्यांची उत्तम साथ लाभली. यात खासदार वंदना चव्हाण, माजी मंत्री फौजिया खान, रोहिणी खडसे, सक्षणा सलगर व इतर महिला नेत्यांचा समावेश आहे. (latest political news)

Adv. participating in campaign rally with Supriya Sule in the constituency. Rohini Khadse
Jalgaon Lok Sabha Constituency : एकनाथ खडसे- फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार? भुसावळात आज सभा

बारामतीच्या लढतीत मुक्ताईनगरची नणंद

विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभाग घेतला. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोहिणी खडसे यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निश्‍चय केला.

रावेरमध्ये पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करताना त्यांनी भावजयीविरोधात मैदानात उतरल्या तर, बारामतीच्या नणंदेसाठी मुक्ताईनगरातील या नणंदेने (रक्षा खडसेंच्या नात्याने) जिवाचे रान करत प्रचार केला.त्यामुळेही ही निवडणूक चांगलीच गाजल्याची चर्चा आता मतदानोत्तर स्थितीत सुरु आहे. या ठाम भूमिकेने रोहिणी खडसेंचे राजकीय वजन पवारांच्या गटात नक्कीच वाढले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पवारांनी व त्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी मुक्ताईनगरसाठी आधीच रोहिणी खडसेंचे नाव जाहीर करुन टाकले आहे. पक्षातील एकूणच नेत्यांचे मूल्यमापन केले तर रोहिणी खडसे आता पवारांच्या पक्षात विश्‍वासू व सक्षम नेत्या म्हणूनही लौकिकप्राप्त झाल्याचे मानले जात आहे.

Adv. participating in campaign rally with Supriya Sule in the constituency. Rohini Khadse
Jalgaon Lok Sabha Constituency : जळगावात मतदानाचा वाढलेला साडेचार टक्का कुणाला फायदा देणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com