Sharad Pawar, Eknath Khadse, Dr. Satish Patil
Sharad Pawar, Eknath Khadse, Dr. Satish Patilesakal

Jalgaon Lok Sabha Election : शरद पवारांच्या भूमिकेने डॉ. सतीश पाटील तोंडघशी; भाजप वापसीचा मुद्दा

Jalgaon : पवारांनी खडसेंच्या भाजपतील प्रवेशाची जाहीरपणे पाठराखण केली. परिणामी, डॉ. सतीश पाटील अक्षरश: तोंडघशी पडले..

Jalgaon News : एकनाथ खडसेंना पक्षात घेऊन चूक केल्याचे शरद पवारांनी बैठकीत कबूल केल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते डॉ. सतीश पाटील यांनी केल्यानंतर अवघ्या काही तासांतच खुद्द पवारांनी खडसेंच्या भाजपतील प्रवेशाची जाहीरपणे पाठराखण केली. परिणामी, डॉ. सतीश पाटील अक्षरश: तोंडघशी पडले.. शिवाय, त्यातून डॉ. पाटलांचा खडसे विरोधही प्रकर्षाने समोर आला. (Jalgaon Lok Sabha Election)

फडणवीस सरकारमधून मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून खडसे भाजपवर, विशेषत: राज्यातील नेतृत्वावर नाराज होते. २०१९ ला त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी उघडपणे राज्यातील नेत्यांवर टीका करणे सुरु केले. अखेरीस ऑक्टोबर २०२० मध्ये खडसे हे कन्या ॲड. रोहिणी यांच्यासह शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झाले.

पवारांनीही वर्षभरापूर्वी खडसेंना विधानपरिषदेवर घेऊन तसेच रोहिणी खडसेंकडे महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून विश्‍वास दर्शवला. रावेर लोकसभेतून खडसेंनी उमेदवारीची तयारी करावी, असे जयंत पाटलांनी सुचविल्यानंतर खडसेही स्वत: उमेदवारी करण्याबाबत बोलत होते.

खडसेंचा लोकसभेस नकार

खडसे राष्ट्रवादीत गेल्यानंतर त्यांच्या स्नुषा व रावेरच्या खासदार रक्षा खडसे भाजपतच राहिल्या. गेल्या काही महिन्यांत रक्षा खडसेंना रावेरमधून पुन्हा लोकसभेसाठी उमेदवारी मिळते की नाही, याबाबत चर्चा सुरु असताना त्यांची उमेदवारी जाहीर झाली. याचदरम्यान गेल्या दोन- चार महिन्यांतच खडसेंच्या भाजपमध्ये परतण्याची चर्चाही सुरु झाली. (Jalgaon Political News)

Sharad Pawar, Eknath Khadse, Dr. Satish Patil
Loksabha Election 2024 : पुन्हा ऑपरेशन लोटस? भाजपने आमदारांना दिली ५० कोटींची ऑफर; मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा

खडसेंनी याच पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रावेरमधील उमेदवारीला नकार दिला, त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी यांनीही त्या विधानसभा लढविणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. त्यापाठोपाठ खडसेंनीच भाजपत प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी रावेरसाठी उमेदवाराची शोधाशोध करावी लागली.

डॉ. सतीश पाटलांची टीका

याच मुद्यावर राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी खडसेंवर टीका केली. खडसेंनी पवारांशी दगाफटका केला, ऐनवेळी निवडणुकीस नाही सांगितले, हे तर ते बोलतच होते. आता भाजप प्रवेशाची भूमिका खडसेंनी घेतल्यानंतर डॉ. पाटील यांनी खडसेंना पक्षात घेतल्याची चूक केल्याचे शरद पवारांनी कबूल केल्याचा दावा केला. एवढ्यावरच पाटील थांबले नाहीत तर, भविष्यातही घरभेद्यांपासून सावध राहावे, असेही ते बोलले.

पवारांनी केली पाठराखण

डॉ. पाटलांनी खडसेंवर टीका केलेली असताना शरद पवारांनी मात्र खडसेंची पाठराखण केली. विविध प्रकारच्या चौकशांमुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे खडसेंना हे करावे लागले असेल, त्याबाबत आपणच त्यांना जे योग्य वाटत असेल ते करा’ असे सुचविल्याचे पवारांनी जाहीरपणे सांगितले. शिवाय, खडसेंची आमदारकीही आपण परत मागणार नसल्याचे पवारांनी स्पष्ट केलेय. पवारांची ही भूमिका डॉ. सतीश पाटलांना चपराक ठरलीय. यामुळे डॉ. पाटील तोंडघशी पडल्याचेच बोलले जात आहे.

Sharad Pawar, Eknath Khadse, Dr. Satish Patil
Madha Loksabha: शरद पवार पक्षातही बंडखोरी? माढा मतदारसंघात अभयसिंह जगताप अपक्ष निवडणूक लढण्याच्या विचारात

डॉ. पाटलांचा खडसे विरोध

मुळात, पवारांनी या संपूर्ण प्रकरणात राजकीय समजूतदारपणा दर्शवल्यामुळे डॉ. पाटलांचे हसू झाल्याचे मानले जात असले तरी डॉ. पाटील हे कधीही खडसेंच्या बाजूने नव्हते. खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशालाही डॉ. पाटील अनुकूल नव्हते. सुरवातीपासूनच त्यांचा खडसेंना विरोध होता. पवारांनी खडसेंनी पक्षात घेऊन, तेच जिल्ह्याचे नेते असतील, असे जाहीर केले होते.

मात्र, डॉ. पाटील, गुलाबराव देवकर आदी मंडळीने खडसेंना नेता म्हणून कधी स्वीकारलेच नाही. जळगाव जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष निवडीच्या वेळीही देवकर- डॉ. पाटलांनी खडसेंविरोधात भूमिका घेली होती, तेव्हापासून दोघांत प्रचंड मतभेद होते. खडसेंनी भाजप वापसीची भूमिका घेतल्यानंतर डॉ. पाटलांची त्यांच्यावर टीका करणारी प्रतिक्रिया येणे स्वाभाविक होते. मात्र, पवारांच्या भूमिकेमुळे पाटलांचीच अडचण झाली आहे.

Sharad Pawar, Eknath Khadse, Dr. Satish Patil
Jalgaon Agriculture News : ज्वारी उत्पादकांना साडे तिनशे कोटीहून अधिक दणका!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com