const e=e=>{const o=window.location.origin;navigator.sendBeacon(`${o}/scooby/api/v1/log/event`,JSON.stringify(e))};e({page_url:window.location.href,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),(()=>{const o=window.history.pushState;window.history.pushState=new Proxy(o,{apply:(o,r,n)=>{const t=window.location.href,i=o.apply(r,n),a=window.location.href;return t!==a&&e({page_url:a,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),i}})})();

Jalgaon Lok Sabha Constituency : भुसावळला महायुती, आघाडीचे फ्लेक्स युद्ध रंगले

Lok Sabha Constituency : येथे लोकसभा निवडणूक प्रचाराला शेवटच्या टप्प्यात चांगलाच रंग भरला असून महायुती व महाविकास आघाडीचे फ्लेक्स युद्ध चांगलेच रंगले आहे.
Lok Sabha Constituency
Lok Sabha Constituency esakal

Jalgaon Lok Sabha Constituency : येथे लोकसभा निवडणूक प्रचाराला शेवटच्या टप्प्यात चांगलाच रंग भरला असून महायुती व महाविकास आघाडीचे फ्लेक्स युद्ध चांगलेच रंगले आहे. विशेष म्हणजे उमेदवारासोबतच स्थानिक आजी- माजी आमदारांचा फोटो ठळकपणे छापण्यात आले आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण २४ उमेदवार रिंगणात आहेत. (flex war of Mahayuti and Maha Vikas Aghadi in bhusawal )

मात्र महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे व महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यात सरळ लढत आहे. सोबतच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय ब्राह्मणे हे देखील जोरात प्रचार करत आहेत. प्रमुख उमेदवार प्रचार फेऱ्या, कोपरा सभा आदींबरोबरच मोठे फ्लेक्स लावून देखील प्रचार करीत आहेत. यात महायुती व आघाडीच्या उमेदवारांचे फ्लेक्स मोठ्या प्रमाणावर आहेत. (latest political news)

Lok Sabha Constituency
Jalgaon Lok Sabha Constituency : ‘मोदी टू बूथ’ अभियानाद्वारे मतदारांपर्यंत पोहोचतोय! अमोल जावळे

शहरातील प्रमुख रस्ते यावल रोड, जामनेर रोड, दशमेश मार्ग येथे रस्त्याच्या दुतर्फा फ्लेक्स झळकत आहेत. निवडणूक म्हटली की, प्रचारासाठी स्थानिक आमदाराला मान देणे आवश्यक असते. त्यामुळे तो कार्यकर्त्यांना कामाला लावू शकतो. हा विचार दोन्ही उमेदवारांनी केला असावा. म्हणूनच रक्षा खडसे यांच्या फ्लेक्सवर आमदार संजय सावकारे यांचा फोटो ठळकपणे छापला आहे.

काही ठिकाणी सावकारे यांचे कट आउट देखील आहेत तर श्रीराम पाटील यांच्या फ्लेक्सवर माजी आमदार संतोष चौधरी यांचा फोटो ठळकपणे छापला आहे. तो इतका ठळक आहे की उमेदवार पाटील आहेत की चौधरी अशी शंका क्षणभर येते. याच फ्लेक्सवर माजी आमदार निळकंठ फालक व माजी आमदार दिलीप भोळे यांचे देखील फोटो आहेत पण ते चौधरी यांच्या इतके ठळक नाहीत. या फ्लेक्स युद्धाचा कोणाला फायदा होईल हे लवकरच समजेल.

Lok Sabha Constituency
Jalgaon Lok Sabha Constituency : एकनाथ खडसे- फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार? भुसावळात आज सभा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com