जळगाव : शेंदुर्णीला भगवान त्रिविक्रम रथोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव : शेंदुर्णीला भगवान त्रिविक्रम रथोत्सव

जळगाव : शेंदुर्णीला भगवान त्रिविक्रम रथोत्सव

शेंदुर्णी (ता. जामनेर,जळगाव ) : धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक ठेवा असलेला भगवान त्रिविक्रम रथोत्सव झेंडूच्या फुलांच्या माळा... आंब्याच्या पानांची तोरणे... आकर्षक रोषणाई... डौलात फडकणारे भगवे ध्वज... रांगोळ्यांनी सजविलेले रस्ते, अशा रोमहर्षक वातावरणात हजारो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. वैकुंठ चतुर्दशीला प्रतिपंढरपूर शेंदुर्णीनगरीचे ग्रामदैवत त्रिविक्रम भगवानाचा २७७ वर्षांची परंपरा लाभलेल्या या रथोत्सवाला भाविकांची मांदियाळी पाहावयास मिळाली.

कडोजी महाराज संस्थानचे आठवे गादीवारस शांताराम महाराज भगत, शारदाबाई भगत आणि अमृत खलसे, विजया खलसे, सतीशचंद्र काशिद, उज्ज्वला काशिद, तुषार भगत, योगीता भगत, गणेश चौधरी, प्रतिभा चौधरी, गोविंद अग्रवाल, संजय गरुड, पंडित जोहरे, शांताराम गुजर, सुधाकर बारी आदींच्या हस्ते रथाची महापूजा झाली. सर्व नगरसेवक, सागर जैन, ॲड. प्रसन्न फासे, रवींद्र गुजर, डॉ. पंकज सूर्यवंशी, महेंद्र गुजर आदी मंडळी उपस्थित होते.

दर्शनासाठी खानदेश, मराठवाडा, विदर्भ येथील भाविकांनी गर्दी केली होती. रथावर फुलांची उधळण करण्यात आली.

हेही वाचा: राज्यातील ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर!

‘श्री त्रिविक्रम भगवान की जय’, ‘कडोबा महाराज की जय’चा जयघोषात रथोत्सवाला सुरुवात झाली. रथाची सजावट माधवबाबा भक्त मंडळ यांनी, तर रथाला मोगरी लावण्याचे काम प्रल्हाद भगत, रमण कोळी, शिवाजी भगत, विठ्ठल महाले आदींनी केले. विजय सोनार, गजानन सुतार, अब्दागिरी भास्कर चौधरी, प्रल्हाद गवळी चोपदार होते. रथावर बसण्याचा मान निंबाजी भगत, अरुण काळे, प्रल्हाद बारी, भास्कर चौधरी, गौरव पाटील, ईश्वर भगत, ज्ञानेश्वर भगत, तर कणगीची जबाबदारी राजू पवार आणि तुषार भगत यांनी पार पाडली. रथमार्गावर स्वामी समर्थ भक्त मंडळ यांनी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला होता. रथचौक, महावीर मार्ग, श्रीत्रिविक्रम मंदिर मार्ग, श्रीदत्त चौक, नुरानी मज्जिद, गांधी चौकमार्गे रथघर चौकात समारोप झाला.

loading image
go to top