esakal | सातपुड्यातील आदिवासी करु लागले उत्तम शेती !

बोलून बातमी शोधा

farmer

सातपुड्यातील आदिवासी करु लागले उत्तम शेती !

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे : धुळे तालुक्यात मजूरांअभावी शेती करणे दुरापस्त झाले आहे. सारेच लहान मोठे शेतकरी मजूर मिळत नसल्याने शेती कशी करायची हा असा प्रश्न उद्विग्नपणे वारंवार उपस्थित करीत असतात. सातपुड्यात राहणारे आदिवासींमुळे शेती आवरली जात आहे. ते नसते तर बरेचसे क्षेत्र पडूनच राहिले असते, असे शेतकरी सांगतात. आता मात्र हेच आदिवासी शेतीत मजूरी करण्या ऐवजी निमबटाईने व जुपने शेती करत स्थिरावले आहेत. स्थानिक शेतकर्‍यांपेक्षा अधिक उत्पादन काढण्यात त्यांचे हात गुंतले आहेत.

हेही वाचा: डॉक्टर आजोबाची कमाल ! मधुमेह, दमा, हृदयविकार..तरीही कोरोनावर मात

तालुक्यात हजारावर आदिवासी मजूर

शिरपूर व मध्य प्रदेशमधील सेंधवा तालुक्यातील सातपुड्यातील हजारावर आदिवासी मजूर धुळे तालुक्यातील शेती शिवारात स्थायिक झाले आहेत. त्यांच्यामुळे शेतीची कामे आवरली जात आहे. स्थानिक मजूरांचा अभाव आहे. जे आहेत ते अधिक मजूरी आणि कमी वेळ राबणे आहे. त्यामुळे शेतीची काम परवडत नाही. निम्मे शेतीची मदार आदिवासी मंजूरावरच असल्याचे शेतकरी आत्माराम पाटील यांनी सांगितले.

शेतीशिवाराऐवजी गावातच स्थायिक

गेल्या पंधरा वर्षात मोठ्या प्रमाणात आदिवासी मजूर कुटूंबासह तालुक्यात स्थायिक झाले आहेत. निम्मेवर मजूर गावातच स्थायिक झाले आहेत. ते रेशनकार्डसह मतदारही स्थानिक झाले आहेत.

स्वतः कसताहेत शेती

स्थानिक शेतकर्‍यांची मुले नोकरीनिमित्ताने शहरांकडे धावताहेत. मोठ्या शेतकर्‍यांनी अधिकची शेती कसणे अवघड झाले आहे. बरेचश्या शेतकर्‍यांची शेती निमबटाई अथवा वार्षिक जुपने आदिवासी कसू लागले आहेत. विशेष म्हणजे विक्रमी भाजीपालाही पिकवू लागले आहेत. शेती कसणारे आदिवासी शेती शिवारातच स्थायिक झाले आहेत.

हेही वाचा: जिल्हाधिकाऱ्यांकडे आली तक्रार; आणि तत्काळ विवाह सोहळ्यावर कारवाई

जि.प.शाळेत त्यांची संख्या निम्यावर

तालुक्यातील जिल्हा परीषद शाळांमध्ये पटावरील निम्यापेक्षा अधिक विद्यार्थी सातपुड्यातीलच आदिवासींची आहेत. दररोज शेती शिवारातून ये जा करु लागली आहेत. गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे ही मुले अभ्यासापासून दुरावली आहेत. त्यांच्यापर्यंत ना शिक्षक पोहचलेले ना आॅनलाईन शिक्षण पोहचलेले आहे. सध्यातरी शिक्षणाची आबाळ होत असल्याचे आदिवासींनी सांगितले.

गुणवत्ता यादीतही चमकताहेत

सातपुड्यातील आदिवासींची मुले शाहू वस्तीतील मुलांच्या बरोबरीने गुणवत्ता जोपासू लागले आहेत. विशाल पावरा आणि मुकेश पावरा हे विद्यार्थी गेल्या वर्षी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत चमकलेत. अन प्रवेश मिळविला.

संपादन- भूषण श्रीखंडे