esakal | जिल्ह्यात बी.टी. बियाण्यांची १८ लाख पाकीटे दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

जिल्ह्यात बी.टी. बियाण्यांची १८ लाख पाकीटे दाखल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : जिल्ह्यात यंदा बी.टी. कपाशीची २६ लाख पाकीटांची मागणी करण्यात आली. त्यातील १८ लाख पाकीटे जिल्हयातील विक्रेत्यांकडे (Farmer cotton seeds) दाखल झाली आहेत. मात्र या बियाण्यांच्या विक्रीला १ जून नंतरच परवानगी आहे. दरम्यान एरंडोल, शिरसोली परीसरात पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांकडून खरीपपूर्व मशागतीच्या कामांना वेग दिला जात आहे. कपाशी बियाणे विक्रीवर बंदी असली तरी काही ठिकाणी कपाशी वाणांची (Jalgaon agriculture department) लागवडीस सुरूवात झाली आहे. (agriculture-department-cotton-seeds-packet-available-farmer)

हेही वाचा: कापडणे ग्रामपंचायतीने पाणीपट्टी केली दुप्पट

जून महिन्यात मृगाच्या पर्जन्यवृष्टीनंतरच बहुतांश ठिकाणी खरीप वाणांच्या पेरणीस सुरूवात केली जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून १५ मे पासूनच मान्सूनपूर्व बागायती कपाशी वाणांची लागवडीस प्राधान्य दिले जात आहे. बऱ्याच ठिकाणी विविध कंपन्यांचे बियाणे बाजारात दाखल होउन काळ्या बाजारात या वाणांची विक्री केली जात आहे. बऱ्याच ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीनंतर वा जेथे पाण्याची उपलब्धता आहे तेथे मे महिन्यातच कपाशी वाणाची लागवड केली जात आहे.

कापूस लागवडीला सुरवात

मान्सूनपूर्व लागवड केलेल्या रोपांवर गेल्या दोन तीन वर्षांपासून लाल्या, गुलाबी बोंड अळीचे आक्रमण झाल्याचे दिसून आले आहे. जिल्हा परीषद, जिल्हा कृषी अधिक्षक विभागाकडून वेळोवेळी समाधानकारक मान्सूनचा पाउस झाल्याशिवाय, जमिनीत किमान ८ ते १० इंच पुरेशी ओल असल्याशिवाय कोणत्याही खरीप वाणांची लागवड करू नये असे आवाहन केले जात असले तरी शेतकऱ्यांकडून मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीनंतर बऱ्याच ठिकाणी कपाशी वाणांच्या लागवड सुरू आहे.

हेही वाचा: फळविक्रेत्‍यांकडून पोलिसास मारहाण; अकरानंतर बाजार बंद करण्याचे कारण

कापसाचे उत्‍पन्न घटले

दरवर्षी ४ते ५ एकर कपाशी वाणाची लागवड मे महिन्याच्या अखेरीस केली जाते. बागायती कपाशीचे एकरी उत्पन्न ८ ते १० क्विंटल अपेक्षीत असून गेल्यावर्षी अतीपावसामुळे दोन वेचणीतच कापूस वेचणीचा हंगाम आटोपला होता. बऱ्याच शेतकऱ्यांचे ५ ते ७ क्विंटलच्या आतच उत्पन्न आले होते. गेल्या आठवडयात दोन वेळा शिरसोली परीसरातच समाधानकारक पाउस आहे.

बियाणे, खते पुरेसे उपलब्ध

जिल्ह्यात यंदा २६ लाख बी.टी.बियाण्यांची पाकीटांची मागणी करण्यात आली. त्यापैकी १८ लाख पाकीटे उपलब्ध झाली आहे. मात्र १ जून नंतरच विक्रीस परवानगी आहे. विविध खतांचा १ लाख टन साठा उपलब्ध झाला आहे. शेतकऱ्यांनी एक जून नंतरच बियाणे पेरणी करावी. खतांची उपलब्धता सुधारीत किंमतीत आहे. त्यापेक्षा अधिक दराने विक्री झाल्याचे आढळल्यास त्याची शेतकऱ्यांनी तक्रार करावी. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी वैभव शिंदे यांनी केले आहे.

मे महिन्यात जास्त उष्णतेमुळे बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर परीणाम होउन रोपे कोमजण्यासह शेतकर्‍यांचे आर्थीक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी मान्सूनचा समाधानकारक पाऊस झाल्याशिवाय कपाशी वाणांसह अन्य कोणत्याही वाणांची पेरणी करू नये.

- संभाजी ठाकूर, जिल्हा कृषि अधिक्षक, जळगाव.