भिषण घटना.. जळगावात कंटरनेने बाप-लेकाला चिरडले !

दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीसह दोन्ही बापलेक दूरवर फेकले गेले.
ACCIDENT
ACCIDENTACCIDENT



जळगाव : शहरातील गुजराल पेट्रोलपंपाच्या (Petrol pump) मागे आजोळी राहत असलेल्या सात वर्षीय मोठ्या मुलाला घेण्यासाठी निघालेल्या बाप-लेकाच्या (Father-sun) दुचाकीस भरधाव कंटनेरने (Container) चिरडल्याची घटना शक्रवारी (ता. ११) रात्री साडेनउ वाजता घडली. दुचाकीस्वार त्याच्या पाच वर्षीय मुलासह पिंप्राळ्याकडून गुजराल पेट्रोलंपाच्या मागे जात असताना कंटेनर चालकाने धडक दिली. या घटनेत बाप-लेकाचा दुर्देवी मृत्यू (Death) झाला.

(container-hits-two-wheeler-father-son-dies)

ACCIDENT
जळगावात ‘डायनासोर’; कुंभारखोरी पार्कमध्ये महाकाय प्रतिकृती

नागेश्‍वर पवार (वय ३५) पिंप्राळा येथे पत्नी तसेच दोन मुलांसह वास्तव्यास होते. शहरातील गुजराल पेट्रोलपंपाच्या मागे राहत असलेल्या आजी- बाबांकडे नागेश्‍वर पवार यांचा मोठा मुलगा सोहम गेलेला होता. त्याला घेण्यासाठी शुक्रवारी रात्री नागेश्‍वर पवार दुचाकीने निघाले. सोबत लहान मुलगा कार्तिक (वय ५) याने ह्ट्ट केल्याने तोही सोबत आला. गुजराल पेट्रोलपंपाजवळ नव्याने तयार होत असलेल्या बोगद्याजवळ वळण घेत असताना, शिवकॉलनीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटनेर (क्र.एन.एल.०१ एसी ८६९४) ने नागेश्‍वर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीसह दोन्ही बापलेक दूरवर फेकले गेले. गंभीर जखमी झाल्याने नागरिकांनी मदतीला धाव घेतली. काहींनी त्यांच्या घरी कळवल्याने पत्नी ज्योती पवार घटनास्थळी पोहचल्या. नागरिकांच्या मदतीने रिक्षातून जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नागेश्‍वर यांना मृत घोषित केले. तर, मुलगा कार्तिकला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती कार्तिकलाही मृत घोषित केले. गुजराल पेट्रोलपंप परिसरातच अर्जूनकुमार सिंग (वय ६५, रा. कोलकत्ता) लपून बसलेल्या ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


बांधकामावर वाॅचमेन

नागेश्‍वर पवार निर्माणाधीन बांधकाम साईटवर वॉचमन म्हणून काम करत होते. पती- पत्नी दोघे दिवसभर राबुन काबाड कष्ट करत दोघा मुलांसह कुटूंबाचा रहाटगाडा ओढत सुखी संसार करत होते. एकाच घटनेच बाप- लेकाचा मृत्यू झाल्याने कुटूंबीयांसह प्रत्यक्षदर्शींनी हळहळ व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com