जुगाराच्या अड्ड्यावर गोळीबार ; माजी महापौराच्या दिवट्याचा प्रताप

jalgaon marathi news; fairing in shivaji nager
jalgaon marathi news; fairing in shivaji nager

जळगाव, ः- शहरातील शिवाजीनगराच्या विस्तारीत वस्ती असलेल्या धनाजी काळेनगर-परशुराम वाघ नगर परिसराला लागून असलेल्या शेतात जुगाराचा मोठा अड्डा चालवला जात हेाता. याच अड्ड्यावर आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जुगार खेळण्यावरून वाद होऊन माजी महापौर पुत्रासह चौघांचा शिवाजीनगर हुडको मधील तरुणाला बेदम मारहाण केल्यानंतर जमाव त्यांच्यावर चालकरुन गेला. जमावाच्या दिशेने मारण्यासाठी अंगावर येत असलेल्या तरुणाच्या दिशेने गोळीबार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या प्रकरणी रात्री उशिरा पर्यंत पेालिसांची कारवाई सुरू होती. 

शिवाजीनगराचा विस्तारीत भाग असलेल्या परशुराम वाघनगराला लागून असलेल्या शेत शिवारात माजी महापौरपुत्र जुगाराचा अड्डा चालवत होता. लाकाऊन काळातही हा अड्डा अविरत पणे सुरू असल्याचे परिसरातील रहिवाशांनी माहिती देताना सांगितले.  शिवाजी नगर हुडको भागातील येथे जुगार खेळण्यासाठी गेला हेाता. जुगार खेळताना वाद होऊन त्या वादातून चौघांनी त्याला बेदम मारहाण करून जखमी केले. त्याने पळत जाऊन घराजवळील पंधरावीस तरुणांना घेऊन येत या जुगार अड्ड्यावर चाल केली. आपल्याला मारण्यासाठी जमाव येत असल्याचे पाहून माजी महापौरपुत्राने ४-५ राऊंड गोळीबार केला. त्यानंतर तो, पुढे आणि जमाव मागे धावत होता. घटनेची माहिती कळाल्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रेाहन, निरीक्षक अरुण निकम यांच्यासह पोलीस  ताफा घटनास्थळावर दाखल झाला. तो पर्यंत हाणामारी करणारे पळून गेले होते. जखमी तरुणाचे नाव पेालिसांना भेटल्यावर त्यांनी त्याचा शोध सुरू केला. शिवाजीनगर हुडको परिसरातील तरुण सूफियान मिर्ज़ा (वय-२२)असे नाव असून पेालिसांनी त्याला ताब्यात घेत रात्री उशिरा पर्यंत चौकशी सुरू होती. गोळीबार झालेले ठिकाण आणि जुगार अड्ड्या बाबत येथील रहिवाश्‍यांनी यापुर्वीही तक्रार केली हेाती. शहर पेालिसांना या अड्ड्यावर चिरीमिरी सुरु असल्याचेही येथील रहिवाश्‍याचे म्हणणे आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com