गोणपाट शिवता शिवता चुलत भाऊ झाले चोर

गोणपाट शिवता शिवता झाले चोर
गोणपाट शिवता शिवता झाले चोर

जळगाव,  ः- राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या निवासस्थाना जवळून एका महिलेची पर्स हिसकावून पळणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करून पकडण्यात आले होते. या दोघा चोरट्यांना पकडल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी यथेच्छ प्रसाद दिल्यावर त्यांनी चार जबरी चोरीचे गुन्हे कबूल केले असून त्यात सर्व महागडे मोबाईल असल्याचे निष्पन्न झाले आहे.  राजेश दिपसींग राजपूत वासुदेव संतोष राजपूत असे दोघा चोरट्यांची नावे असून ते, कृऊबात गोणपाट शिवण्याचे काम करीत होते.

जळगाव तालुक्यातील तरसेाद रहिवासी राजेश दिपसींग राजपूत, वासुदेव संतोष राजपूत असे दोघे भावंड जळगाव कृषिउत्पन्न बाजार समितीत गोणपाट शिवण्यासाठी येत होते. दुचाकीवर चालता बोलता त्यांनी एका महिलेचा मोबाईल हिसकवला. चोरीचा मोबाईल पाच हजारात विक्री झाल्याने त्यांनी काम सेाडून चोरीचा धंदा अवलंबला हेाता. शुक्रवार(ता.३) रेाजी ओकारेश्‍वर मंदिरा मागे माजी. मत्र्यांच्या गल्लीतून एका महिलेची पर्स चेारुन अजिंठा चौकातून पळून जात असलेल्या चोरट्यांना पोलीस कर्मचारी निलेश पाटील, अतुल वंजारी,जितेंद्र राजपूत, विजय नेरकर यांनी अडवून पकडले हेाते. दोघांवर संशय वाटल्याने त्यांना ताब्यात घेत चौकशी केल्यावर त्याच्याजवळ महिलेची पर्स आढळून आली. राजेश दिपसींग राजपूत, वासुदेव संतोष राजपूत यांना पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केल्यावर त्यांनी चोरीची कबुली दिली होती. पोलीस प्रसाद दिल्यावर त्यांनी एका मागून एक चार गुन्हे कबूल केले असून चारही गुन्ह्यात महागडे मोबाईल चोरून नेले आहेत. आयोध्या नगरातील सुनीता टेम्भरे यांनी आज एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून २३ हजारांचा मोबाईल हिसकावल्याची तक्रार दिल्यावरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून दोन्ही भावंडाना या गुन्ह्यात वर्ग करण्यात येणार असल्याचे तपासाधीकारी आनंदसींग पाटील यांनी सांगितले.   

एक मोबाईल पाच हजारात
तरसेाद येथील अकारीवाडा येथे वास्तव्यास असलेले  राजेश दिपसींग राजपूत वासुदेव संतोष राजपूत यांचा गोणपाट शिवण्याचा खानदानी व्यवसाय असून तीन शे रुपये रेाजाने ते कामाला होते. मात्र, मोबाईल हिसकवुन पळण्याचा नाद लागल्याने त्यांनी कामाला रामराम ठोकला हेाता. पेालिसांनी त्यांच्या ताब्यातून जप्त केलेले मोबाईल त्यांनी प्रत्येकी पाच हजारात विक्री केल्याची माहिती पेालिसांना मिळाली असून आणखी गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com