दुवाँ करेा..कोरोना भाग जाऐ..पालकमंत्र्यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 July 2020

मुस्लिम बांधवांनी कोरोना सांभाळत ईद साजरी करावी, कोणत्याही सणासाठी पोलीस कर्मचार्‍याला बारा तास ऑनड्यूटी उभे रहावे लागते, आतातर कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे पोलीसांना कोणताही त्रास होणार नाही म्हणून आगामी येणारे सण शांतते साजरे होतील. बकरी ईदच्या वेळेस मुस्लिम बांधवांना हिंदू बांधव मदत करेल, तर गणेशोत्सवात हिंदू बांधवांना मुस्लिम बांधवांना सहकार्य करा म्हणजे येथून पुढे होणारे सण शांतते होतील.

जळगाव - देश शांत करण्यापेक्षा गाव शांत करा, कायद्याची भाषा बोलून समजूत घालण्यापेक्षा आपणहून हिंदू- मुस्लिम बांधवांनी एकमेकांमध्ये मिसळून, परस्परांना मदत करत, आगामी काळातील सण गुण्या गोविंदाने तसेच शांततेत साजरी करावेत असे आवाहन, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. कोरोना सारखे जागतीक संकटाचा आपण सामना करतोय..प्रार्थना करा की, लवकरात लवकर संकट टळेल अशी भावनीक सादही यावेळी त्यांनी उपस्थीतांना घातली. 

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या मंगलम हॉलमध्ये शांतता कमिटीच्या बैठकीत ते, बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर आमदार राजूमामा भोळे, महापौर भारती सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधिक्षिका भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहम यांच्यासह वरीष्ठ पेालिस निरीक्षक राजेशसींह चंदेल, पोलीस निरीक्षक अकबर पटेल, फारूख शेख, जमिल देशपांडे, गफ्फार मलिक, माजी उपमहापौर करीम सलार, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांच्यासह सर्व समाजाचे प्रतिनीधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकमेकांना मदत करा
ना. पाटील पुढे बोलतांना म्हणाले की, मुस्लिम बांधवांनी कोरोना सांभाळत ईद साजरी करावी, कोणत्याही सणासाठी पोलीस कर्मचार्‍याला बारा तास ऑनड्यूटी उभे रहावे लागते, आतातर कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे पोलीसांना कोणताही त्रास होणार नाही म्हणून आगामी येणारे सण शांतते साजरे होतील. बकरी ईदच्या वेळेस मुस्लिम बांधवांना हिंदू बांधव मदत करेल, तर गणेशोत्सवात हिंदू बांधवांना मुस्लिम बांधवांना सहकार्य करा म्हणजे येथून पुढे होणारे सण शांतते होतील. असे आवाहन उपस्थितांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

पोलिसांचा प्रतिसाद नसतो..
प्रत्येकच पेालिस ठाण्यात सामाजीक कार्यकर्त्यांना योग्य प्रतिसाद मिळत नाही, अधिकारी त्यांच्या सुचना ऐकून घेत नाही आणि जेव्हा परिस्थीती बिघडते तेव्हा हेच लोक कामात पडतात..याचाही वरीष्ठ अधिकाऱ्यांनी विचार करावा अशा कानपिचक्या भाजप आमदार राजुमामा भोळे यांनी पेालिस अधीकाऱ्यांना दिल्यात.

सोशल मिडीयाचा दुरुपयोग नको
कोव्हीडच्या आपातकालीन संकटामुळे जिल्ह्यात सामाजिक व आर्थिक नुकसान झाले आहे. सलोखा, सौदार्यपूर्ण संबंध समाजात टिकून रहावे यासाठी आपण प्रयत्न करुयात, कायदा हातात घेवून नका, सोशल मिडीायचा जपून वापर करा, खात्री केल्याशिवाय कोणताही संदेश प्रसारीत करु नका, तसेच फॉरवर्ड करुन नका, सोशल मिडीयावरील चुकीच्या माहितीला बळी पडू नका, त्याचे अप्रिय प्रतिसाद समाजात उमटतात. पहिल्या टप्प्यात ईद, गोकूळअष्टमी, गणपती, नवरात्र आगामी सण उत्सवांमध्ये संपूर्ण विचार करुन नियोजन ककरावे लागेल, आरोग्य अबाधीत राहील व सणाला गालबोट लागणार नाही, अशा पध्दतीने सण साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मनेगातून केले.

संपादन - रईस शेख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news;Celebrate upcoming festivals with happyness ; Minister Gulabrao Patil