शेजाऱ्यांच्या घरात...लाईट-कुलर सुरु होता..मग

शेजाऱ्यांच्या घरात...लाईट-कुलर सुरु होता..मग
शेजाऱ्यांच्या घरात...लाईट-कुलर सुरु होता..मग

जळगाव, :- शेजारील कुटुंबीय बाहेर गावी गेलेले आहे, असे असताना घरात लाईट सुरू आणि कुलरचाही आवाज येतोय...म्हणून शेजाऱ्यांनी डोकावून बघितल्यावर त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकण्यात आल्याचे आढळून आले. घरमालकांना कळवल्यावर त्यांनी जळगावी धाव घेतली.घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील दहा हजारांचे दागिने आणि वीस हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केल्याचे आढळून आले. रामानंदनगर पेालिसांत या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

गृहिणी सन्मित्र कॉलनीत गोदावरी चक्कीजवळ   कल्पना पारेख यांच्या घरात नारखेडे हे भाडेतत्त्वावर राहतात.त्यांना घरात कुलर व पंखा सुरू असल्याचे लक्षात आले.त्यानंतर त्यांनी ता. 30 जून रोजी सकाळी दहा वाजता कल्पना पारेख यांना फोन करून गावाहुन आले का, अशी विचारणा केली. तुमच्या घरात पंखा व कुलूर सुरू आहे, असे सांगितल्यावर त्यांनी नकार दिल्याने नारखेडे यांनी घरात डोकावुन बघितल्यावर घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले.  त्याच दिवशी पारेख या जळगांवला परतल्या. घरी आल्यावर त्यांना दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला दिसला. घरात सामान विखुरून पडला होता. कपाटातील मुद्देमाल जागेवर नसल्याचे दिसून आले.चोरट्यांनी ऐवज लंपास केल्याची खात्री झाल्यानंतर आज पारेख यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरातील दहा हजार रुपयांचे दागिने आणि २० हजार रुपये रोख असा तीस  हजारांचा ऐवज चोरीला गेला असून तपास साहाय्यक फौजदार रवी नरवाडे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com