चिमुरडीच्या साक्षीने साठवर्षीय थेरड्याला जन्मठेप

Life imprisonment for abusing an 11-year-old girl
Life imprisonment for abusing an 11-year-old girl

 जळगाव, ः- शौचास गेलेल्या अकरावर्षीय पिडीतेला..उचलून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या साठ वर्षीय थेरड्याला आज जिल्‍हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. न्या. पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात पीडिताने त्या..दिवसाचा संपूर्ण घटनाक्रम आपल्या साक्षीत नोंदवला, प्राप्त पुरावे दस्तऐवज आणि वैद्यकीय अहवालावरून गुन्हा शाबीत होत तुकाराम रंगमले याची जन्मठेपेच्या शिक्षेवर रवानगी करण्यात आली.

नशीराबाद येथील ११ वर्षीय बालिका शौचालयाला गेलेली असताना साठवर्षीय तुकाराम विश्‍वनाथ रंगमले यांने तीला बळजबरी उचलून निर्जन ठिकाणी नेत बलात्कार केल्याची घटना (१३ ऑगस्ट २०१८) घडली होती. पीडिताच्या वडिलांच्या तक्रारीवरून तुकाराम रंगमले यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात (कलम -३७६, ३२३ व लैंगिक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण अधिनीयम-२०१२कायद्यांतर्गत) गुन्हा दाखल झाला होता. दुसऱ्या दिवशी १४ ऑगस्ट २०१८ रोजी आरोपी तुकाराम रंगमलेस अटक करण्यात आली.सहाय्यक निरीक्षक आर.टी.धारबळे आणि त्यांच्या पदोन्नतीनंतर तपासाधिकारी सचिन बागुल यांनी अचूक पणे करून साक्षी पुराव्यानिशी ९ ऑक्टोबर २०१८) जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले हेाते.  

महत्त्वाच्या ९ साक्ष 
जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांच्याकडे खटल्याचे कामकाज सुरू होते. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. केतन ढाके यांनी नऊ महत्त्वाच्या साक्षीदारांच्या साक्ष नोंदवून घेतल्या.  यात पिडीत मुलीचे व फिर्यादी वडील, पंच नरेंद्र साळुंखे, पिडिता, चेतन धनगर, पोलीस नाईक अमोल पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश खेताडे, गटविकास अधिकारी मंजूश्री गायकवाड, सहाय्यक निरीक्षक  रंगनाथ धारबळे, सचिन बागुल आदींनी अचूक पद्धतीने साक्ष नोंदवली. 

पिडीतेच्या साक्ष सुन्न करणारी
घटनेच्या दिवशी (१३ ऑगस्ट)ला..घडलेल्या किळसवाणा प्रकार पिडीत चिमुरडीने..न घाबरता अचुकपणे न्यायालयात मांडला..संताप आणणाऱ्या या अत्याराचा घटनाक्रम ऐकून उपस्थितही काही काळ स्तब्ध झाले होते. पिडीते नंतर   चेतन धनगर, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्ष आणि एकत्रित पुराव्याच्या आधारे आरोपी तुकाराम विश्वनाथ रंगमले याच्यावर देाषारोप सिद्ध होऊन न्यायाधीश पी. वाय.लाडेकर यांच्या न्यायालयाने ( भादवि ३७६ प्रमाणे आणि लैंगिक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलमाप्रमाणे) जन्मठेप व ५ हजार रुपयाचा दंड ठोठावला.

अटकेपासूनच म्हातारं कारागृहात
तुकाराम रंगमले हा अटके पासून कारागृहातच होता. त्याला दोषी ठरविल्यानंतर शिक्षा कमी व्हावी अशी मागणी आरोपीने न्यायाधीशांकडे केली. मात्र, जिल्हा सरकारपक्षाने त्यावर जोरदार हरकत घेतली. त्यावर आरोपीला जन्मठेप आणि ५ हजार रुपयाचा दंड कायम केला आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. वकील केतन ढाके, आरोपीतर्फे ॲड. संतोष सांगोळकर यांनी काम पाहिले.
--------------पूर्ण 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com