मलेशियातील पत्नीला व्हिडिओ कॉन्फरन्सने घटस्फोट

रईस शेख
Thursday, 13 August 2020

जळगावातील या दाव्यात पती जळगावात वास्तव्यास आहे आणि त्याची पत्नी नोकरीनिमित्त मलेशियात  म्हणजे विदेशात वास्तव्यास आहे. कोरोना आजाराच्या साथीमुळे विमाने बंद असल्याने या पत्नीला अखेरच्या जबाबासाठी विमानाने भारतात येणे शक्य नव्हते म्हणून न्यायाधीशांनी हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने तिचा जबाब नोंदवून घेण्याचा निर्णय घेतला

जिल्ह्यातील पहिला घटस्फोटाचा अंतिम निवाडा

जळगाव वादी आणि प्रतिवादी पती, पत्नीचे अखेरचे जबाब व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने नोंदवून आज येथील कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाच्या खटल्यात अंतिम निवाडा दिला. अशा प्रकारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने जबाब नोंदवून न्यायालयाने जरी केलेला हा जिल्ह्यातील  पहिला निकाल ठरला आहे, अशी माहिती ॲड.ज्योती भोळे यांनी दिली.

ॲंड ज्योती भोळे यांनी सांगितले की, यापूर्वी नागपूर, पुणे, नाशिक  येथील न्यायालयांनी असे निकाल दिलेले आहेत. मात्र, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जाब-जबाब होऊन घटस्फोट होण्याचा हा जिल्ह्यातील पहिला निकाल म्हणावा लागेल. जळगावातील या दाव्यात पती जळगावात वास्तव्यास आहे आणि त्याची पत्नी नोकरीनिमित्त मलेशियात  म्हणजे विदेशात वास्तव्यास आहे. कोरोना आजाराच्या साथीमुळे विमाने बंद असल्याने या पत्नीला अखेरच्या जबाबासाठी विमानाने भारतात येणे शक्य नव्हते म्हणून न्यायाधीशांनी हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने तिचा जबाब नोंदवून घेण्याचा निर्णय घेतला होता आणि तो त्या दोघांना कळवल्यानंतर दोघांचा व्हिडिओ कॉन्फरन्सवर कामकाजाला सुरुवात होऊन. त्यानुसार आज ही अखेरचा जबाब नोंदवण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर हिंदू विवाह कायद्याच्या (१९५५) कलम १३ ( बी ) नुसार आपसातील संमतीने या घटस्फोटाचा निवाडा न्या. रितेश लिमकर यांनी जाहीर केला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news;Malaysian wife divorced by video conference