दहा वर्षीय बालिकेवर भरदिवसा गोलाणीत बलात्कार 

दहा वर्षीय बालिकेवर भरदिवसा गोलाणीत बलात्कार 
दहा वर्षीय बालिकेवर भरदिवसा गोलाणीत बलात्कार 

जळगाव, - शहरातील गोलाणी व्यापारी संकुलाच्या तिसऱ्या मजल्यावर भरदिवसा दहा वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घडली. लॉकडाऊन काळात मार्केट बंद असून महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या तिसऱ्या मजल्यावरील गाळ्यांमध्ये नेऊन भामट्याने भिक्षा मागणाऱ्या चिमुरडीचे लचके तोडले. जखमी अवस्थेत पिडीतेच्या वृद्ध आत्याने शहरपोलिसांना घटना सांगितल्यावर एकच खळबळ उडून पेालिसांनी पिडीतेला उपचारार्थ जिल्‍हा रुग्णालयात रवाना केले असून संशयिताचा शोध सुरू केला आहे. 

पिडीतेच्या आत्याने सांगितल्या नुसार, सराफबाजार सुभाषचौकात पिडिता व तिचे कुटुंबीय भिक्षा मागून उदरनिर्वाह करतात. आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास भवानी मंदिरा जवळ पिडिता आत्यासोबत जेवण करत असताना एका अज्ञात दुचाकीस्वाराने तिला माझ्या सोबत चल..तुला खायला देतो असे म्हणत वाहनावर बसवून गेालाणी व्यापारी संकुलात आणले. तिसऱ्या मजल्यावरील मनपाच्या बंदपडलेल्या गाळ्यातील शौचालयात नेऊन या पीडितावर अत्याचार करून भामटा दुचाकीने पसार झाला. जखमी अवस्थेत पिडिता रडत गोलाणी मार्केटच्या मंदिराजवळ उभी असताना शिवसेना कार्यकर्त्या मंगला बारी यांनी तिची चौकशी केल्यावर घडला प्रकार उघडकीस आला.घडला प्रकार पेालिसांना कळवल्यावर शहर पेालिसांनी पिडीतेला तिच्या वृद्ध आत्यासोबत ताब्यात घेत उपचारार्थ डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले. 

सीसीटिव्ही फुटेजचा शोध
घडल्या प्रकाराची गंभीर दखल घेत, शहर पोलीस  ठाण्याच्या पथकाने पिडीतेने सांगितलेल्या माहिती नूसार सुभाष चौक ते, गोलाणी मार्केट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलनास सुरुवात केली होती. पिडीतेसह तिच्या वृद्ध आत्याचा जबाब नोंदवल्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.  

मनपाला जाग येईना..
मध्यवर्ती गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावर यापुर्वीही अनेक गैरप्रचार उजेडात आले आहे. घटना घडलेल्या गाळे बंद असून येथे कचरा साठवला  जातो. एरवी रात्री येथे गैरकृत्य करणाऱ्या महिला तरुणींचा वावर असतो. चाकू लावून पैसे हिसकण्याचे प्रकारही येथे घडतात, मात्र लॉकडाऊन सुरू असल्याने संपूर्ण मार्केट बंद असून दिवसा ढवळ्या येथे गैरप्रकार घडत असल्याने मनपाने बंद गाळे भाडेतत्त्वावर वापरण्यास द्यावे जेणे करून गैरप्रकार थांबतील अशी मागणी शिवसेना पदाधिकारी मंगला बारी यांनी केली आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com