Anil Patil News : खडसेंच्या आमदारकीसाठी माझे योगदान मोलाचे : मंत्री अनिल पाटील

Anil Patil : माझे मंत्रीपद चार महिन्यासाठी असो की, चार दिवसांसाठी असो माझ्या मतदारसंघातील जनतेमुळे मला मंत्रीपद मिळाले याचा अभिमान आहे.
Minister Anil Patil, Eknath Khadse
Minister Anil Patil, Eknath Khadse esakal

Anil Patil News : माझे मंत्रीपद चार महिन्यासाठी असो की, चार दिवसांसाठी असो माझ्या मतदारसंघातील जनतेमुळे मला मंत्रीपद मिळाले याचा अभिमान आहे. परंतु तुम्ही ज्या साडेचार वर्षे बाकी असलेल्या आमदारकीचा अभिमान मिरवित आहात. ती आमदारकी तुम्हाला माझ्या मतामुळे मिळाली आहे. माझ्या आमदारकीत मात्र तुमचे योगदान शून्य आहे असा सणसणीत टोला राज्याचे मदत व पुनवर्सनमंत्री तसेच राष्ट्रवादीं कॉंग्रेस अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी आमदार एकनाथ खडसे यांना लगावला आहे. (Jalgaon Minister Anil Patil statement My contribution to Khadse MLA is valuable)

एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत मंत्री अनिल पाटील हे केवळ चार महिन्यासाठी आमदार आहेत, पुन्हा निवडून येतील की नाही अशी टिका केली होती. त्याला उत्तर देतांना मंत्री अनिल पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्षात खडसे यांना कोणीही विचारीत नव्हते, त्यावेळी ते आपल्याकडे राष्ट्रवादी क्रॉंग्रेस पक्षात घेण्याबाबत वरिष्ठांना सांगावे असा आग्रह करीत होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातही अनेकांचा विरोध असतांना मी वरिष्ठांना आग्रह करून त्यांना राष्ट्रवादी पक्षात घ्यायला लावले. त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली, त्यावेळी त्यांना निवडून आणण्यासाठी मी व अजितदादा पवार यांनी प्रयत्न केले. आम्ही त्या ठिकाणी ठाण मांडून बसलो व मतदान करून घेतले. (latest marathi news)

Minister Anil Patil, Eknath Khadse
Jalgaon Lok Sabha Election : आता ‘बेड’वरील ज्येष्ठांना पोस्टल मतदानाचा पर्याय; हेळसांड थांबणार

फुटलेल्या ४५ आमदारांपैकी तब्बल २५ आमदारांनी आमच्या सांगण्यावरून खडसे यांना मतदान केले. जर आम्ही प्रयत्न केले नसते, तर खडसे आमदारच झाले नसते. त्यांना घरी बसावे लागले असते. त्यांच्या आमदारकीत माझा वाटा आहे, परंतु माझ्या आमदारकीत त्यांचा वाटा शून्य आहे.

मी दोन वेळा त्यांच्या नेतृत्वाखाली आमदारकीला उभा होतो, परंतु दोन्ही वेळा पराभूत झालो. आता मी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये स्वत:च्या ताकदीवर उभा रहिलो व निवडून आलो. त्यामुळे आताही त्यांनी माझ्या निवडून येण्याबाबत चिंता करू नये असे मतही मंत्री पाटील यांनी व्यक्त केले.

Minister Anil Patil, Eknath Khadse
Jalgaon News : संस्कारांचं पावित्र्य, शाही सोहळ्यांच्या स्वप्नपूर्तीचा प्रयत्न : लिना पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com