प्लॅस्टिक पिशव्या उत्पादनावर जळगाव महापालिकेची धडाकेबाज कारवाई

प्लॅस्टिक बंदीवर जळगाव महापालिकेतर्फे धडाकेबाज कारवाई सुरू आहे.
Jalgaon Municipal Corporation action against plastic bag production
Jalgaon Municipal Corporation action against plastic bag productionsakal

जळगाव : प्लॅस्टिक बंदीवर महापालिकेतर्फे धडाकेबाज कारवाई सुरू आहे. गुरुवारी (ता. ७) औद्योगिक वसाहतीतील कारखाना व एका किराणा दुकानावर धाड टाकून मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला आहे. (Latest marathi news)

शहरातील पांडे चौकातील दयाल प्रोव्हिजन येथील दुकानात ५१ मॅक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या साधारण ५० किलो जप्त करण्यात आल्या व त्यांच्याकडून रुपये ५००० दंड वसूल करण्यात आला आहे. दुसरी कारवाई औद्योगिक वसाहतीतील गो-ग्रीन इंडस्ट्रीजमध्ये करण्यात आली. कंपनीत प्रतिबंधित नॉन ओव्हन मटेरिअलच्या पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात साठा आढळला त्यामुळे सदर कंपनीमधील प्रतिबंधित मालाचा साठा असलेला भाग सिल करण्यात आला आहे. तर रामेश्‍वर कॉलनीतील चामुंडा एन्टरप्रायझेस येथे प्रतिबंधित नॉन ओव्हन मटेरीयलच्या पिशव्या तयार करत असल्याचे आढळून आले.

Jalgaon Municipal Corporation action against plastic bag production
व्याजाचे आमिष दाखवित पावणे दोन करोडला गंडा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

एक हजार किलोपर्यंतचा माल जप्त करून ५००० रुपये दंड वसूल करण्यात आला. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, सहाय्यक आयुक्त अभिजित बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली ताराचंद ठाकरे उपस्थितीत प्लॅस्टिक बंदी पथक प्रमुख जितेंद्र किरंगे, अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख संजय ठाकूर, आरोग्य युनिट प्रमुख कुणाल बारसे, विशाल वानखेडे, सुरेश भालेराव आदींच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

Jalgaon Municipal Corporation action against plastic bag production
शरद पवारांवर महाजनांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'त्यांना माहिती होतं...'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com