
जळगाव : शहराील दहा रस्त्यांची कामे करण्यास मक्तेदारांकडून होत असलेला विलंब, तसेच मक्तेदारांकडून नवीन ३९ रस्त्यांसाठी नवीन दराची मागणी यामुळे कामे रखडण्याची शक्यता आहे. लोकांचा रोष पाहता ही कामे लवकर होण्याची गरज आहे. त्या करिता मक्तेदार बदलून कामाचे विभाजन करून १५ मक्तेदारांकडून कामे करून घेण्याबाबत नगरविकास विभागाशी चर्चा झाली आहे, त्याला प्राथमिक मंजुरीही मिळाली असल्याची माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. (Jalgaon Municipal Corporation will change contractors for 39 roads in city)
शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सर्वसामान्य जनतेत तीव्र नाराजी आहे. रस्ते तयार करण्याची कामे तातडीने करण्यात यावी, अशी जनतेची मागणी आहे. शहरातील ४९ रस्त्यासाठी शासनाचा निधी प्राप्त आहे. त्यासाठी मक्तेदारही नियुक्त करण्यात आला आहे. त्यातील दहा रस्त्यांची कामे करण्यासाठी मक्तेदाराला महापालिकेने लेखी पत्र दिले आहे. परंतु अद्यापही त्या रस्त्याची कामे होत नसल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. या शिवाय ३९ रस्त्यांसाठी मक्तेदाराने कामे करण्यासाठी नवीन दराची अट टाकली आहे. यामुळे त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम काढून महापालिकेमार्फत करण्याबाबत तसेच मक्तेदार बदलण्याबाबत नगरविकास विभागाशी चर्चा केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राथमिक मंजुरी पण...
शहरातील ३९ रस्त्यांसाठी मक्तेदार बदलण्यासाठी नगरविकास विभागाने प्राथमिक मंजुरी देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र या रस्त्यासाठी जो निधी देण्यात आला आहे. त्यात कोणतीही दरवाढ देण्यात येणार नाही अशी अट आहे, त्यामुळे मक्तेदार बदलला तर नवीन दराचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला, त्यावेळी महापालिकेने या कामातील दोन किंवा तीन रस्ते कमी करून ते महापालिका फंडातून करून देण्याबाबत तयारी दाखविली असल्याचे सांगण्यात येत आहे. आता त्या दृष्टीने विचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे
महापालिका १५ मक्तेदार देणार
नगरविकास विभागाने महापालिकेला ३९ रस्त्यांच्या कामाबाबत अंतिम मंजुरी दिल्यास प्रशासनाने आराखडा तयार केला असल्याचे सांगण्यात येत आहे. ३९ रस्त्यांसाठी एकच मक्तेदार नियुक्त न करता त्या कामाचे विभाजन करण्यात येईल. १५ मक्तेदार नियुक्त करून त्यांना कामे देण्यात येतील त्यामुळे ही कामे वेगाने होणार आहेत. शहरातील दहा कामे एकाच मक्तेदाराकडे देवून त्यांच्याकडून कामास होत असलेल्या विलंबामुळे कामाचे विभाजन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.