Latest Marathi News | मोठ्या भावाच्या विरहाने 48 तासांत धाकट्या भावाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death

Jalgaon : मोठ्या भावाच्या विरहाने 48 तासांत धाकट्या भावाचा मृत्यू

निभोरी(जि.जळगाव) : निंभोरी खुर्द (ता. पाचोरा) येथील गजानन तुळशिराम दिवटे (वय ३६) याचे मंगळवारी (ता. २०) पहाटे सव्वातीनला अल्प आजाराने निधन झाले. (Death of younger brother within 48 hours due to death of elder brother Jalgaon Latest Marathi News)

हेही वाचा: स्कुटीच्या धडकेने गंभीर जखमी झाल्याने ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू

त्यानंतर त्यांचा गुरुवारी (ता. २२) सारीचा कार्यक्रम होता. त्यांचा धाकटा भाऊ राहुल तुळशीराम दिवटे (वय ३१) हे गेल्या सहा महिन्यांपासून आजाराशी झुंज देत होते. मात्र मोठ्या भावाचे निधन झाल्याने त्याचा धसका घेऊन राहुलचे गुरुवारी (ता. २२) सव्वापाचच्या सुमारास अवघ्या ४८ तासांच्या अंतराने निधन झाले. गजानन दिवटे यांच्या सारीचा कार्यक्रम सकाळी आठला आटोपल्यानंतर दुपारी बाराला राहुल यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी पोलिस पाटील (कै.) तुळशिराम नारायण दिवटे (पाटील) यांची ही मुले होत.

हेही वाचा: माहिती अधिकाराचा धाक दाखवून खंडणी उकळणाऱ्या व व फरारी आरोपीला पोलिसांनी केली अटक

Web Title: Death Of Younger Brother Within 48 Hours Due To Death Of Elder Brother Jalgaon Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaondeath