

Jalgaon Election Results 2026
Sakal
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना जळगाव महानगरपालिकेत एक अनोखी आणि भावनिक घटना घडली आहे. शिवसेना (शिंदे गट) चे माजी महापौर ललित कोल्हे यांनी कारागृहातून निवडणूक लढवून प्रभाग क्रमांक ११ मधून दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांच्यासोबतच त्यांची आई सिंधुताई कोल्हे आणि मुलगा पियुष कोल्हे यांनीही अनुक्रमे प्रभाग ११ आणि प्रभाग ४ मधून विजय प्राप्त केला आहे. कोल्हे कुटुंबातील तिन्ही सदस्यांच्या या विजयामुळे समर्थकांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळाला.