Jalgaon Munical News : मनपा आयुक्तपदाबाबत सुनावणी पूर्ण; या तारखेपर्यंत लागणार निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation

Jalgaon Munical News : मनपा आयुक्तपदाबाबत सुनावणी पूर्ण; या तारखेपर्यंत लागणार निकाल

जळगाव : महापालिका आयुक्तपदाच्या पदभाराची सुनावणी सोमवारी (ता. १६) ‘मॅट’मध्ये पूर्ण झाली. मात्र, निकाल राखीव ठेवला असून, येत्या तीन ते चार दिवसांत तो लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Jalgaon Municipal News : जळगाव महापालिकेचा प्रशासकीय पेच सुटणार?

जळगाव महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची २९ नोव्हेंबरला शासनाने अचानक बदली केली होती. परभणी येथील महापालिका आयुक्त देवीदास पवार यांची त्या पदावर नियुक्ती केली होती. श्री. पवार यांनी ३० नोव्हेंबरला जळगावला दाखल होऊन पदभार स्वीकारला होता. त्या वेळी बदली झालेल्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड प्रशिक्षणासाठी पुण्यात होत्या.

आपल्या पश्‍चात पदाचा एकतर्फी पदभार स्वीकारल्याबाबत डॉ. विद्या गायकवाड यांनी आपल्या बदलीला आव्हान देणारी याचिका ‘मॅट’मध्ये दाखल केली होती. त्यावर ‘मॅट’ने डॉ. गायकवाड यांच्या बदलीला स्थगिती दिली. मात्र, आयुक्तपदाचा पदभार देवीदास पवार यांच्याकडेच ठेवला. कायम पदभार देण्याबाबत सुनावणी सुरू होती.

हेही वाचा: Jalgaon Municipal Corporation : महापालिकेत 2 आयुक्त, खुर्चीवर मात्र कोणीच नाही!

त्यावर सोमवारपर्यंत मॅटमध्ये एकूण सहा तारखा झाल्या आहेत. सोमवारीही सुनावणी होती. त्यावर निकाल येण्याची अपेक्षा होती. मात्र, दोन्ही गटांची सुनावणी ‘मॅट’मध्ये पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, निकाल राखीव ठेवला असून, येत्या तीन ते चार दिवसांत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Jalgaon Municipal Corporation : अधिकाऱ्यांची कमी,शासनाकडून मात्र होतेय बदली

महापालिका आयुक्त देवीदास पवार यांच्याकडे पदभार देण्यात आला असला, तरी त्यांना कामाबाबत ‘मॅट’ न्यायालयाने काही अटी- शर्ती टाकल्या आहेत. त्यामुळे शहरातील इतर कामांवरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून आयुक्तपदाचा पदभार ‘मॅट’ कोणाकडे देणार, याकडे लक्ष लागून आहे. आता या निकालाची आणखी तीन ते चार दिवस जळगावकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.