महापालिका प्रभाग समिती सभापती बिनविरोध

शिवसेनेने एकही सभापतिपद न घेता विरोधकांना दिली संधी
अर्ज दाखल करताना रूखसाना बी. बबलूखान, सुन्नाबी राजू देशमुख, पार्वता भिल.
अर्ज दाखल करताना रूखसाना बी. बबलूखान, सुन्नाबी राजू देशमुख, पार्वता भिल.Sakal
Updated on

जळगाव - महापालिकेच्या चारही प्रभाग समितीच्या सभापतिपदाची निवड बिनविरोध झाली. सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकमताने निर्णय घेतला. सत्ताधारी शिवसेनेने एकही सभापतिपद न घेता विरोधकांना चारही सभापतिपद दिले आहे. महापालिकेच्या प्रभाग समिती सभापती निवडीसाठी अर्ज भरण्याचा आज (ता. १८) अखेरचा दिवस होता. सत्ताधारी शिवसेना तसेच भाजप, बंडखोर व एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत सभापती निवड बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला सर्वच पक्षांनी मंजुरी दिली.

चारही सभापतिपद विरोधकांना

सभापतिपद निवडीसाठी सर्वपक्षीय सदस्यांची बैठक घेण्यात आली, यात सत्ताधारी शिवसेनेतर्फे सुनील महाजन, नितीन लढ्ढा, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, बंटी जोशी तर भाजपतर्फे आमदार सुरेश भोळे, गटनेते भगत बालाणी, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक विशाल त्रिपाठी, तर भाजपमधून बंडखोरी करून बाहेर पडलेल्या गटातर्फे उपमहापौर कुलभूषण पाटील, ॲड. दिलीप पोकळे आदी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेतर्फे एकही प्रभागाचे सभापतिपद न घेण्याची भूमिका जाहीर करण्यात आली, त्यामुळे चारही पदे विरोधकांना देण्यात आली, त्यात एक सभापतिपद भाजपला, तर एक एमआयएम व दोन बंडखोर गटाला देण्यात आले आहे.

असे दाखल झाले अर्ज

सर्व पक्षिय बैठकीत झालेल्या निर्णयानुसार सभापतिपदासाठी प्रत्येक प्रभागासाठी एकच अर्ज दाखल झाला सभापती व अनुमोदक, सूचक असे : प्रभाग समिती एक : खान रूखसाना बी बबलूखान (बंडखोर)- अनुमोदक ॲड. दिलीप पोकळे, सूचक- नवनाथ दारकुंडे, प्रभाग समिती दोन : मुकुंदा सोनवणे (भाजप) - अनुमोदक भगत बालाणी, सूचक - रंजना सोनार, प्रभाग समिती तीन - सुन्ना बी राजू देशमुख (एमआयएम)- अनुमोदक- रियाज बागवान, शे.सायराबी, प्रभाग क्रमांक चार : पार्वता भिल (बंडखोर) - अनुमोदक - ललित कोल्हे, सूचक - कुलभूषण पाटील

बुधवारी निवड सभा

प्रभाग सभापती निवडीसाठी बुधवारी (ता. २०) सभा होणार आहे. सतरा मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात सकाळी अकरा वाजता होणार ही सभा होइल. पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shahada Bribery Case
Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Marathi News Esakal
www.esakal.com