Jalgaon Municipality News : माय महापालिका... भीक नको पण कुत्रे आवर..! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात 11 शेळ्यांचा मृत्यू

महापालिका नागरी वस्त्यांत मूलभूत सुविधा देण्यास असमर्थ असल्याचे पदोपदी जाणवतेच.
11 goats died
11 goats diedesakal

Jalgaon Municipality News : महापालिका नागरी वस्त्यांत मूलभूत सुविधा देण्यास असमर्थ असल्याचे पदोपदी जाणवतेच. पण आता सेवांची भीकही मिळेनाशी झाली आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण नसल्याने आता मोकाट कुत्र्याचा थेट नागरी वस्‍त्यावर हल्ले वाढले आहे. अशाच हल्ल्यात वाल्मीक नगरात गोठ्यावर हल्ला करून मोकाट कुत्र्यांनी चक्क ११ शेळ्यांचा बळी घेतल्याचा प्रकार आज पहाटे उघडकीस आला. (Jalgaon Municipality 11 goats died in attack by stray dogs in city marathi news )

जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. नागरी वस्त्या असोत की, शहराबाहेरील नव्या वसाहती. मानवी वस्त्यांवर आता या कुत्र्यांच्या दहशत निर्माण झाली असून लहान मुलांवर होणारे कुत्र्यांचे हल्ले नित्याचे झाले आहे. पण आता जंगली कुत्र्यांप्रमाणे मोकाट कुत्रे सामुहीक शिकारी करू लागले आहे. वाल्मीकनगर परिसरात प्रकाश चिंतामण कोळी यांचा घरगुती शेळी पालन करून ते, कुटुंबाचा रहाट गाडा ओढत आहे.

घराजवळच छोटासा गोठा उभारून त्यात शेळी पालन ते करतात. नेहमी प्रमाणे शनिवार(ता.३१) च्या मध्यरात्री त्यांच्या गोठ्यावर मोकाट कुत्र्यांच्या टोळीने हल्ला चढवला. या हल्ल्यात एक दोन नाही तर, चक्क ११ शेळ्यां मोकाट कुत्र्यांनी मारुन टाकल्या. त्यातील अनेक फस्त केल्या. आज रविवार(ता.३१) रोजी पहाटे सहाला प्रकाश कोळी उठल्यावर त्यांना गोठ्यात शेळ्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आल्यावर शेळी पालक प्रकाश कोळी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. (latest marathi news)

11 goats died
Jalgaon Municipality News : महापालिका आयुक्त आल्या सायकलवर; ‘नो व्हेईकल डे

आर्थिक मदतीची अपेक्षा

शेळीपालनावर उदरनिर्वाह करणारे प्रकाश कोळी यांच्या गोठ्यावर हल्ला करून मोकाट कुत्र्यांनी अंदाजे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे.महापालिकेच्या दुर्लक्षपणामुळे मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. यावेळी तलाठी राहुल सोनवणे यांनी पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी कोळी कुटुंबीयांनी केली आहे.

आज शेळी..उद्या लेकरं

दिवसा गल्लीत खेळणाऱ्या चिमुरड्यांवर हल्ला करून मोकाट कुत्रे लचके तोडत होते. आता चार-पाच वर्षाच्या मुलांनाही कुत्रे आता ओढून घेवुन जाऊ लागले आहे. शिवाजीनगर, उस्मानिया पार्क भागातील चार वर्षाच्या बालिकेला असेच कुत्र्यांच्या तावडीतून नागरीकांनी वाचवून रुग्णालयात दाखल केल्याची घटना ताजीच आहे.

शहरातील कांचन नगर,जैनाबाद, शिवाजीनगर, हुडको, गेंदालालमील, शाहुनगर अशा संमिश्र नागरी वस्त्यांमध्ये उन्हाळ्यात अंगणात झोपण्याचे प्रमाण अधिक असते. कुटुंबातील लहानग्यांना अंगणात घेऊन झोपलेल्या कुटुंबीयांवर हल्ला होऊन मानवी जीव गेल्यास नवल वाटणार नाही. इतकी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.

11 goats died
Jalgaon Municipality News : 'अमृत'च्या नावाने नवीन रस्त्यांचा सत्यानाश सुरूच!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com