Jalgaon News : नागदुली येथे अंगावर वीज कोसळून वडिलांसमोरच तरुण मुलाचा मृत्यू!

Jalgaon News : शेतात काम करीत असताना अचानक वीज कोसळून ३५ वर्षीय युवकाचा वडिलांच्या डोळ्यांसमोरच मृत्यू झाल्याची घटना नागदुली (ता. एरंडोल) येथे शुक्रवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडली.
death
death esakal

एरंडोल : शेतात काम करीत असताना अचानक वीज कोसळून ३५ वर्षीय युवकाचा वडिलांच्या डोळ्यांसमोरच मृत्यू झाल्याची घटना नागदुली (ता. एरंडोल) येथे शुक्रवारी (ता. १२) दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडली. डोळ्यांसमोरच तरुण मुलाचा मृत्यू झाल्याचे पाहताच वडिलांना मोठा धक्का बसला आहे.

नागदुली येथील श्रीकांत पाटील (वय ३५) हा युवक त्याचे वडील भिका पाटील व मजुरासह नागदुली शिवारातील गट क्रमांक ५०१ मध्ये हॉटेल राधिकाच्या मागील बाजूस असलेल्या स्वतःच्या शेतात काम करीत होते. दिवसभर काम केल्यानंतर दुपारी सव्वाचारच्या सुमारास ते घरी जाण्याच्या तयारीत असताना अचानक विजांचा कडकडाट होऊन वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली.

पाऊस सुरू झाल्याने श्रीकांत व त्याचे वडील भिका पाटील व शेतात काम करणारा मजूर शेतातच थांबले. शेतातील पत्र्याच्या शेड असलेल्या गोठ्याजवळ असलेला गुरांचा चारा झाकत असताना अचानक त्या ठिकाणी असलेल्या निंबाच्या झाडावर वीज कोसळली. त्या ठिकाणी काम करीत असलेल्या श्रीकांत पाटील यांच्या अंगावर देखील वीज कोसळल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

श्रीकांतचे वडील भिका पाटील आणि मजूर, असे तिघेही आठ ते दहा फूट अंतरावरच जवळजवळ काम करीत होते. वीज कोसळल्याचा जोरात आवाज आल्याने भिका पाटील यांनी मुलास आरोळी मारली आणि पाठीमागे वळून पाहिले असता मुलगा श्रीकांत हा चाऱ्यावरच पडला असल्याचे दिसले. पाटील यांच्या डोळ्यांसमोरच मुलाच्या अंगावर वीज कोसळल्यामुळे त्यांनी जोरजोरात आरोळ्या मारण्यास सुरवात केली.

death
Haryana School Bus Accident: 'काका, प्लीज हळू चालवा', मुले ड्रायव्हरला सांगत होती पण...हरियाणातील स्कूल बस अपघातावेळी काय घडलं?

पाटील यांनी आरोळ्या मारल्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी श्रीकांत यास तत्काळ जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणीनंतर तो मृत झाल्याचे सांगितले. नागदुली येथे वीज कोसळून युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती समजताच आमदार चिमणराव पाटील, तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याच्या सूचना केल्या.

तसेच मृताच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. मृत श्रीकांत पाटील यांच्या मागे पत्नी, तीन आणि सहा वर्षांच्या दोन मुली, अडीच वर्षाचा एक मुलगा, वृद्ध आई-वडील, चार विवाहित बहिणी, असा परिवार आहे. सकाळी वडिलांसह शेतात कामासाठी गेलेल्या तरुणाचा वीज कोसळून अचानक मृत्यू झाल्यामुळे परिवारातील सदस्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

घरातील कर्त्या युवकाचा वीज कोसळून मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नाना महाजन यांनी शासकीय रुग्णालयात मृताच्या परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले.

death
Accident : धायरीत टँकरच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com