Jalgaon NCP Protest : महायुतीच्या 3 तोंडी रावणाचे पुतळा दहन; राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आंदोलन

NCP Congress : महायुतीच्या तीन तोंडी रावणाचे राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे बुधवारी (ता. ९) राष्ट्रवादी कार्यालयासमोर प्रतीकात्मक पुतळा करून दहन करण्यात आले.
Mangala Patil, Valmik Patil and others while burning the symbolic effigy of Mahayuti's three-faced Ravana on Wednesday.
Mangala Patil, Valmik Patil and others while burning the symbolic effigy of Mahayuti's three-faced Ravana on Wednesday.esakal
Updated on

जळगाव : महायुतीच्या तीन तोंडी रावणाचे राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे बुधवारी (ता. ९) राष्ट्रवादी कार्यालयासमोर प्रतीकात्मक पुतळा करून दहन करण्यात आले. ‘वध तीन तोंडी रावणाचा-लढा स्त्री सन्मानाचा’, ‘महायुतीचा शासनाचा निषेध असो’, ‘महिलांबाबत अनुद्‌गार काढणाऱ्या महायुतीच्या नेत्यांचा निषेध असो’ आदी घोषणांनी परिसर दणाणला होता. युती सरकारच्या काळात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यामुळेच महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. (Nationalist Congress party movement to burn effigy of Ravana against Mahayuti 3 faces )

त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रेरणेतून, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या संकल्पनेतून ‘वध तीन तोंडी रावणाचा, लढा महिलांच्या सन्मानाचा’ ही टॅग लाईन घेऊन युती सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. महायुती सरकारच्या कार्यकाळात सत्ताधारी पक्षातील सहकाऱ्यांच्या महिलांविरोधी अनेक घटना आहेत. मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री संजय राठोड, आमदार देवेंद्र भुयार, वामन म्हात्रे आदींनी महिलांबाबत निषधार्ह व्यक्तव्य केले आहे. त्यांचा निषेध या वेळी करण्यात आला. (latest marathi news)

Mangala Patil, Valmik Patil and others while burning the symbolic effigy of Mahayuti's three-faced Ravana on Wednesday.
Jalgaon Protest : मार्गावरील खड्ड्यात पेटवली चूल; खिचडी शिजवून आंदोलन

आंदोलनावेळी तीन तोंडी रावण बनवून त्याचे दहन करून युती सरकारचा निषेध करण्यात आला. आंदोलन पक्षाचे महानगराध्यक्ष मंगला पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले. माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष शालिग्राम मालकर, जिल्हा प्रवक्ते वाल्मीक पाटील, कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, महिला सरचिटणीस वर्षा राजपूत, युवक महानगराध्यक्ष रिंकू चौधरी, कल्पिता पाटील, मीनाक्षी शेजवाड, कलाबाई शिरसाट, अशोक पाटील, वाय. एस. महाजन, सुनील माळी, रमेश बाहरे, दिलीप माहेश्वरी, विशाल देशमुख, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला.

Mangala Patil, Valmik Patil and others while burning the symbolic effigy of Mahayuti's three-faced Ravana on Wednesday.
NCP Protest : जयंत पाटील यांना ईडीच्या नोटिसीबद्दल सांगोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने केला निषेध व्यक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com