Jalgaon News : मुक्ताईनगर-शाहपूर बायपासच्या चौपदरीकरणासाठी 784 कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Road Construction Work Incomplete

Jalgaon News : मुक्ताईनगर-शाहपूर बायपासच्या चौपदरीकरणासाठी 784 कोटी

मुक्ताईनगर : औरंगाबाद- इंदूर महामार्गावरील पहूर ते खंडवा एनएच-७५३ एल या खंडातील मुक्ताईनगर ते शाहपूर बायपास या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी भारतमाला परियोजना अंतर्गत ७८४.३५ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

हेही वाचा: रुग्णालयातील मेडीकलमधूनच औषधे घेतले पाहीजे का? औषधी सक्तीच्या अध्यादेशाची जनजागृती नाहीच!

या योजनेचा मार्ग भौगोलिक रूपाने मध्य प्रदेशचा बऱ्हाणपूर जिल्हा व महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातून जात असून, दोन राज्यांना जोडणाऱ्या मुख्य औरंगाबाद-इंदूर महार्गावर स्थित आहे. सध्या एनएच -७५३ एल हा दोन पदरी वाहनमार्ग असून, जो जामनेर तालुक्यातील पहूरपासून ते मध्य प्रदेशातील खंडवा शहरापर्यंत आहे. हा मार्ग जळगाव जिल्ह्यातील जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर सोबत बऱ्हाणपूर शहराला जोडतो व खंडवा शहराजवळ एनएच-३४७ बी या जंक्शनवर समाप्त होतो.

हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

या परियोजनेत महामार्गाला जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि बऱ्हाणपूर जिल्ह्यातील दापोरा व इच्छापूर येथील आवश्यक ठिकाणी बायपासची तरतूद करण्यात आली आहे. या रस्त्याचे मुक्ताईनगरपर्यंत चौपदरीकरण झाल्यानंतर इंदूरवरून औरंगाबाद जाणाऱ्या वाहतुकीस या मार्गावर वळविण्यात येणार आहे. आधी औरंगाबाद-इंदूर महामार्गावरील वाहतूक मुक्ताईनगर शहरातून जात असल्यामुळे शहरात अनेक अपघात झाले होते.

हेही वाचा: Jalgaon Road Condition : जळगावातील रस्त्यांच विषयच वेगळा! विधानपरिषदेत गाजतोय मुद्दा

त्यासाठी या महामार्गावरील मुक्ताईनगर शहरातून जाणारी वाहतूक खासदार रक्षा खडसे यांनी पूर्णत: बंद करून हा रस्ता गावाबाहेरून वळविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यामार्फत अनेकदा मागणी केली असून, आता या मागणीस यश मिळाले आहे.