Jalgaon Municipality News : महापालिकेतर्फे ई वाहनधारकांसाठी शहरात 2 ठिकाणी चार्जिंग स्टेशन

Jalgaon News : महापालिकेतर्फे ई वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सद्यःस्थितीत शहरात दोन ठिकाणी चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात येत आहेत.
electric vehicle charging station (file photo)
electric vehicle charging station (file photo) esakal

Jalgaon Municipality News : महापालिकेतर्फे ई वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सद्यःस्थितीत शहरात दोन ठिकाणी चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात येत आहेत. याबाबतचे कार्यादेश देण्यात आले असल्याची माहिती आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दिली.

शहरात ई वाहनांची संख्या वाढत आहे. मात्र त्यांना शहरात चार्जिंगसाठी शहरात कोठेच व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे वाहनधारकांना समस्या निर्माण होत आहे. (jalgaon Charging station at 2 locations in city for E vehicle)

यासाठी महापालिकेने शहरात सागरपार्क व बहिणाबाई उद्यान येथे चार्जिंग स्टेशन उभारण्याचे निश्चित केले होते. त्यासंदर्भात कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यासाठी तेथे स्वतंत्र असा वीज पुरवठा, चार्जिंग स्टेशनला वाहन चार्जिंगसाठी लावल्यानंतर जेवढी वीज वापरली जाईल, त्यानुसार त्याचे पैसे द्यावे लागणार आहे.

महापालिकेतर्फे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत असल्याने आता ई वाहनधारकांना घराबाहेर तातडीने आपले वाहन चार्जिंग करता येणार आहे.

electric vehicle charging station (file photo)
Jalgaon CCI Centre : कापसाला 7 हजारांपर्यंत भाव वाढीचे चिन्हे; आंतरराष्ट्रीयस्तरावर मागणी वाढली

यामुळे ई वाहनधारकांना प्रोत्साहन मिळून शहरात वाढत्या प्रदूषणाला आळा बसणार आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

तसेच जळगाव महापालिका लवकरच शहरात ई बससेवा सुरू करीत आहे. त्यासाठीही या चार्जिंग स्टेशनचा वापर करण्यात येणार आहे. शहर बससेवेसाठी बसडेपोचा आराखडाही केंद्रांकडे पाठविण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

electric vehicle charging station (file photo)
Jalgaon News : उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत उमविला 20 कोटींचा निधी; पंतप्रधानांच्या हस्ते डिजिटल लॉन्चिंग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com