Jalgaon News : रस्त्याची कामे 31 मार्चपर्यंत पूर्ण करा : महापालिका आयुक्त पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Commissioner

Jalgaon News : रस्त्याची कामे 31 मार्चपर्यंत पूर्ण करा : महापालिका आयुक्त पवार

जळगाव : राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या ४२ कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या ४९ रस्त्यांची कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करावीत, असा आदेश महापालिका आयुक्त देवीदास पवार यांनी मक्तेदारांना दिला आहे. महापालिकेने शहरातील ४९ पैकी ४७ रस्त्यांच्या कामासाठी ना हरकत प्रमाणपत्रही दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: Jalgaon Crime News : 10 वर्षांची कमाई चोरल्याने घर घेण्याचे स्वप्न भंगले!

शहरातील रस्त्यांच्या कामासाठी शासनाने १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. या निधीतून ४२ कोटी रुपयांची कामे मंजूर झाली असून, कामांना सुरवात झाली आहे. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मक्तेदारांकडून पूर्ण करण्यात येत आहेत.

हेही वाचा: Jalgaon Municipal News : जळगाव महापालिकेचा प्रशासकीय पेच सुटणार?

मात्र, मक्तेदाराकडून काम संथगतीने केले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्याचीच दखल घेऊन आयुक्त देवीदास पवार यांनी मक्तेदारास पाचारण करून कामांची माहिती घेतली. कामाची गती वाढवावी व ३१ मार्चपर्यंत कामे पूर्ण करावीत, असे आदेश दिले.