Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal

Jalgaon News : महापालिकेने घरपट्टी भरण्याच्या दंडाची 'या' तारखेपर्यंत वाढविली

Published on

जळगाव : महापालिका घरपट्टी व पाणीपट्टी ३१ डिसेंबरच्या मुदतीनंतर भरल्यास दंड आकारणी करण्यात येणार होती. मात्र, आता या दंडाची मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आल्याचे आदेश आयुक्त देवीदास पवार यांनी काढले आहेत.

हेही वाचा: जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporation : महापालिकेत 2 आयुक्त, खुर्चीवर मात्र कोणीच नाही!

या आर्थिक वर्षात महापालिकेची घरपट्टी व पाणीपट्टी कर भरण्यास १ जानेवारीपासून दंड आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्याची मुदत आता वाढविण्यात आली आहे. ३१ जानेवारीपर्यंत कराची रक्कम भरल्यास कोणत्याही दंडाची आकारणी करण्यात येणार नाही. नागरिकांनी याचा लाभ घेऊन आपल्या कराच्या रकमा त्वरित भराव्यात, असे अवाहनही आयुक्त पवार यांनी केले आहे.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon News : कर्जबाजारी, नापिकीला कंटाळून वर्षभरात 181 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

घरपट्टी भरण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. शनिवारी (ता. ३०) सुटीच्या दिवशी नागरिकांसाठी कराचा भरणार करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. त्यास नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. केवळ चार तासांत तब्बल २३ लाख रुपयांचा भरणा महापालिकेच्या तिजोरीत झाला होता. नागरिकांचा हा प्रतिसाद लक्षात घेऊनच ही सूट वाढविण्यात आली असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com