Jalgaon News : अमळनेर मतदारसंघातील रस्त्यांचे भाग्य उजळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Road Development

Jalgaon News : अमळनेर मतदारसंघातील रस्त्यांचे भाग्य उजळणार

अमळनेर : मतदारसंघातील विविध रस्त्यांसाठी पीएमजीएसवाय योजनेंतर्गत तिसऱ्या टप्प्यासाठी १५ कोटी ३७ लाख ९५ हजार रुपयांचा भरघोस निधी आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला आहे.

हेही वाचा: Jalgaon News | ‘अमृत’चे कनेक्शन दिलेल्या तारखेत पूर्ण करा : जिल्हाधिकाऱ्यांची मक्तेदारांना तंबी

अमळनेर मतदारसंघातील दळणवळणासाठी महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांच्या निधीसाठी आमदार अनिल पाटील प्रयत्नशील होते. अनेक वर्षांपासून मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील नागरिकांना रस्त्यांचा बिकट प्रश्न भेडसावत होता.आमदार अनिल पाटील हे मागच्या दीड ते दोन वर्षांपासून ग्रामीण भागातील रस्त्यांच्या निधीसाठी पाठपुरावा करत होते. अखेर पीएमजीएसवाय योजनेंतर्गत १५ कोटी ३७ लाख ९५ लाखांचा निधी मंजूर झाल्याने आमदारांनी समाधान व्यक्त केले.

या निधीतून तालुक्यातील मारवड जैतपिर- ६ किलोमीटर रस्त्यासाठी ४ कोटी ७ लाख ९१ हजार, मुडी- बोदर्डे- भरवस- लोणपंचम- सबगव्हाण- चौबारी ९ किमी रस्त्यासाठी ७ कोटी २४ लाख ३९ हजार, तर पारोळा तालुक्यातील शेवगे-पुनगाव-शेवगे बुद्रुक कंकराज-रत्नपिंप्री ६ किमी रस्त्यासाठी ४ कोटी ५ लाख ६५ हजार, असा एकूण १५ कोटी ३७ लाख ९५ हजार रुपयांचा निधी मतदारसंघासाठी मंजूर झाला.

हेही वाचा: Jalgaon Municipal News : जळगाव महापालिकेचा प्रशासकीय पेच सुटणार?

लवकरच कामाला सुरवात होणार असल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले. या भागातील ग्रामस्थांनी मंजूर झालेल्या कामाबद्दल आमदार अनिल पाटील यांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :JalgaonRoad Development