Jalgaon News : नापिकाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

Jalgaon News : सततच्या नापिकीला कंटाळून येथील ४१ वर्षीय शेतकऱ्याने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता.१८) घडली.
Late Valmik Patil
Late Valmik Patilesakal

Jalgaon News : सततच्या नापिकीला कंटाळून येथील ४१ वर्षीय शेतकऱ्याने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता.१८) घडली. याबाबत माहिती अशी, येथील रहिवासी वाल्मीक पोपट पाटील यांची तीन एकर कोरडवाहू शेती आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यांना शेतातून अपेक्षित उत्पन्नच मिळत नसल्याने ते प्रचंड आर्थिक विवंचनेत होते. (farmer took extreme steps)

सततच्या नापिकीमुळे त्यांच्यावर बॅंकांसह बचत गटांचे कर्ज झाले होते. शेतात राबराब राबूनही निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पन्नच मिळत नसल्याने ते हताश झाले होते. परिस्थिती बदलेल म्हणून त्यांच्या कुटुंबीयांकडून त्यांची सतत समजूतही घातली जात होती.

अखेर रविवारी (ता. १८) दुपारी तीनच्या पूर्वी घरी कोणी नसताना वाल्मीक पाटील यांनी घरातील लोखंडी ॲंगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Late Valmik Patil
Jalgaon News : लग्नात झालेल्या मारहाणीच्या अपमानामुळे तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

काही वेळानंतर त्यांची मुलगी घरी आली असता, तिला वडिलांनी आत्महत्या केल्याचे लक्षात आले. तिने तत्काळ तिचे काका समाधान पाटील यांना सांगितल्यानंतर ते धावत कुटुंबासह घरी आले.

या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. वाल्मीक पाटील यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवालदार नरवाडे तपास करीत आहेत.

Late Valmik Patil
Jalgaon Fraud News : तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीने लाखोंचा नजराणा गडप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com