Jalgaon News : प्रशिक्षण गैरहजर राहणाऱ्या 85 कर्मचाऱ्यांना नोटीसा

Jalgaon News : विविध निवडणुकांच्या प्रशिक्षणाच्या वेळी अनेक अधिकारी कर्मचारी फिजिकल प्रेझेंट राहत असत. अनेक जण स्वाक्षरी करून तेथेच अन्यत्र टंगळमंगळ करत असत.
Electoral Returning Officer Pramod Hille, Additional Assistant Election Returning Officer Prashant Patil etc. in training for Lok Sabha elections
Electoral Returning Officer Pramod Hille, Additional Assistant Election Returning Officer Prashant Patil etc. in training for Lok Sabha electionsesakal

मेहुनबारे : यापूर्वी झालेल्या विविध निवडणुकांच्या प्रशिक्षणाच्या वेळी अनेक अधिकारी कर्मचारी फिजिकल प्रेझेंट राहत असत. अनेक जण स्वाक्षरी करून तेथेच अन्यत्र टंगळमंगळ करत असत. मात्र यावेळी दिलेल्या प्रशिक्षणावर आधारित २५ प्रश्नांची बहुपर्यायी प्रश्नपत्रिका देखील उपस्थित प्रशिक्षणार्थी कर्मचारी अधिकाऱ्यांना द्यावी लागली, त्यामुळे यावेळचे इलेक्शन देखील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी एक परीक्षा ठरणार आहे. (Jalgaon Notice to 85 employees absent from election training)

असे चित्र निर्माण झाले आहे आजच्या प्रशिक्षणात अनुपस्थित असलेल्या ८५ अधिकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. येत्या १३ मेस होणाऱ्या जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी चाळीसगाव विधानसभा मतदार संघातील नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना चाळीसगाव येथे नुकतेचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात गैरहजर असलेल्या ८५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणेदाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

जळगाव लोकसभा मतदार संघात १३ मेंस मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. निवडणुक निर्णय अधिकारी प्रमोद हिले, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी घेतले. तर प्रशिक्षणाची जबाबदारी निवडणुक नायव तहसीलदार संदेश निकुंभ.

Electoral Returning Officer Pramod Hille, Additional Assistant Election Returning Officer Prashant Patil etc. in training for Lok Sabha elections
Jalgaon Protest News : भुसावळला ट्रकखाली डोके ठेवून आंदोलन! सणासुदीत रस्त्याचे खोदकाम केल्याने ‘रास्ता रोको’

निवासी नायब तहसीलदार, जितेंद्र धनराळे, महसूल नायब तहसीलदार विकास लाडवंजारी, संगायो नायव तहसीलदार भानुदास शिंदे आदीच्या देखरेखीखाली चाळीसगाव विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना वैभव मंगल कार्यालयात दोन सत्रात प्रशिक्षण झाले. सकाळच्या सत्रात ४३० तर दुसऱ्या सत्रात ८८० इतर मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी २५ प्रश्नांची बहुपर्यायी लेखी चाचणी परीक्षा घेण्यात आली.

टपाली मतपत्रिका

नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी मतदानाच्या हक्कापासुन बंचित राहू नये म्हणून टपाली मतपत्रिका मिळण्याचा फॉर्म व निवडणुक कार्य प्रमाणपत्र मिळण्याचा फॉर्म वितरीत करण्यात आला.

दांडीवहादरांना नोटीसा

नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी ८५ मतदान अधिकारी व कर्मचारी या प्रशिक्षणास गैरहजर होते. त्यांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वये कारवाई करणेबाबत नोटीसा बजाविण्यात आल्य.

Electoral Returning Officer Pramod Hille, Additional Assistant Election Returning Officer Prashant Patil etc. in training for Lok Sabha elections
Jalgaon District Bank : जिल्हा बँकेच्या धोरणामुळे गटसचिवांना घरघर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com