Jalgaon News : पाचोरा शहरातील मुख्य रस्त्यांची चाळण; अपघातांत वाढ

Jalgaon News : शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून, रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. यामुळे अपघातांची संख्याही वाढली आहे. नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
pothole on the road in front of the Bazar Samiti entrance.
pothole on the road in front of the Bazar Samiti entrance.esakal

पाचोरा : येथील शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून, रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. यामुळे अपघातांची संख्याही वाढली आहे. नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. मात्र, पालिका प्रशासन सुस्त असून, समाज मनातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. (number of potholes on main roads in Pachora city increased)

शहरात भुयारी गटारीचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची कामे करण्यात येतील, असे पालिका प्रशासनातर्फे सांगण्यात येत होते. रस्ते अधिकच खराब झाले होते, त्यांची डागडुजी मागील काळात पालिकेने केले. मात्र, पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण सांगून रस्त्याची कामे लांबणीवर टाकली जात आहेत.

त्यामुळे अपघात वाढत असून, जीवितहानीची भीती निर्माण झाली आहे. शहरातील भडगाव रोड परिसर शहराचा हार्ट मानला जातो. पालिकेने हरितपथ म्हणून भडगाव रोडचे नामकरण केले आहे. शहराची शान असलेल्या या प्रमुख रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.

त्यात सुशील डेअरी व बाजार समितीच्या तिन्ही प्रवेशद्वारांसमोरील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची लांबी, रुंदी व खोली दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे खड्डा चुकविण्याच्या नादात दुचाकीस्वारांचे अपघात नित्याचे झाले आहेत. रात्री अंधारात खड्डे दिसत नसल्याने भरधाव येणारी वाहने आढळतात. त्यामुळे वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. (latest marathi news)

pothole on the road in front of the Bazar Samiti entrance.
Jalgaon Lok Sabha Election : शिरूरच्या मैदानात प्रचारासाठी उतरली ‘मुक्ताईची लेक’; ॲड. रोहिणी खडसेंचा शिक्रापूरला सभांचा धडाका

राजे संभाजी रेल्वे भुयारी मार्ग, गो. से. हायस्कूल, रिंग रोड व बसस्थानक रस्त्यासह शहरालगच्या वसाहतीतील रस्त्यांवरील खड्डे दिवसागणिक वाढत आहेत. अशीच अवस्था शहरातील इतर प्रमुख रस्त्यांची आहे. पालिकेसह सर्व शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी या रस्त्यांवरून वापरतात.

मात्र, ते चारचाकी वाहनांमधून वापरत असल्याने त्यांना कदाचित खड्डे दिसत नसावेत, म्हणून त्यांचे या जीवघेण्या खड्ड्यांकडे लक्ष केंद्रित होत नसावे, असा संतप्त सूर नागरिक व्यक्त करीत आहेत. शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी पालिकेकडे केली असली, तरी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यायला पालिका प्रशासनाला वेळ नाही.

आचारसंहितेचे गोंडस कारण दाखवून नागरिकांच्या जीविताशी पालिकेचा खेळ सुरू आहे. रस्त्यांच्या कामासाठी आचारसंहितेची कोणतीही अडचण नसल्याचेही जाणकारांकडून बोलले जात आहे. पालिका प्रशासनाने आपली कुंभकर्णी झोप मोडून नागरिकांच्या जीवावर उठणारे रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजजावेत व अपघातात होणारी जीवितहानीची भीती नष्ट करावी, अशी मागणी होत आहे.

"सतत वर्दळीच्या भडगाव रोड भागात नवीन रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. मार्केट कमिटीचे गेट व सुशील डेअरीसमोर असलेले खड्डे वाढत आहेत. त्यांची त्वरित दुरुस्ती करावी. या रस्त्यांवर मोठा अपघात व जीवितहानीची भीती आहे."- अनिल येवले, सामाजिक कार्यकर्ते

pothole on the road in front of the Bazar Samiti entrance.
Jalgaon Lok Sabha Constituency : जळगावात 20, रावेर मतदारसंघात 29 उमेदवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com