Jalgaon Crime News : पोलिस दलाचा ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाईचा ‘षटकार’; महिलेसह 6 जणांची एकाचवेळी हद्दपारी

Jalgaon Crime News : लोकसभा निवडणुकीच्या पाश्‍र्वभूमीवर जिल्हा प्रशासन व पोलिस दल संयुक्तपणे अट्टल गुन्हेगारांवर कारवाई करीत आहे.
Crime
Crime esakal

Jalgaon Crime News : लोकसभा निवडणुकीच्या पाश्‍र्वभूमीवर जिल्हा प्रशासन व पोलिस दल संयुक्तपणे अट्टल गुन्हेगारांवर कारवाई करीत आहे. त्याअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतर्गत पोलिस दलाने एका महिलेसह तब्बल सहा जणांवर ‘एमपीडीए’अंतर्गत हद्दपारीची कारवाई केली आहे. (Jalgaon Crime News)

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा प्रशासन व पोलिस दलाच्या माध्यमातून अट्टल गुन्हेगार, वाळू माफिया, अवैध धंद्यांमध्ये गुंतलेल्या गुन्हेगारांवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने हद्दपारीची कारवाई संयुक्तपणे कारण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत अशा अनेक गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. पोलिस प्रशासनाने याअंतर्गत आणखी सहा जणांवर ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई करत त्यांना हद्दपार केले आहे.

नशिराबाद ठाण्याअंतर्गत चार

यात नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत विशाल उर्फ विक्की उर्फ मांड्या नामदेव सपकाळे (वय २८) रा. डीएनसी महाविद्यालय, शंकरराव नगर (जळगाव) याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याच्याविरुद्ध अवैध वाळू चोरी, हातभट्टी दारु विक्री अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याला नशिराबाद ठाण्याच्या पथकाने १८ एप्रिलला ताब्यात घेऊन त्याची कोल्हापूर येथील कारागृहात रवानगी केली आहे.

नशिराबाद ठाण्याच्या हद्दीत संदीप गणेश ठाकूर (वय ३०) रा. डीएनसी महाविद्यालयाजवळ, शंकरराव नगर (जळगाव) याच्यार वाळूचोरी, हातभट्टी दारु विक्री, औषधी द्रव्य विषयक गुन्हे दाखल आहेत. त्यालाही नशिराबाद पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची पुणे येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. नशिराबाद ठाण्याच्या अंतर्गत विलास वामन कोळी (वय २८) रा. जळगाव खुर्द याच्याविरुद्ध दारुबंदी कायद्याअंतर्गत ९ दाखल आहेत.

Crime
Mumbai Crime News: धक्कादायक! मुंबईतील शॉपिंग सेंटरच्या टॉयलेटमध्ये महिलेचा विनयभंग करुन हत्येचा प्रयत्न

झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले कायद्यान्वये हे गुन्हे दाखल आहेत. त्यालाही ताब्यात घेऊन त्याची ठाणे येथील कारागृहात रवानगी करण्यात आली. नशिराबाद ठाण्याअंतर्गत शांताराम सुका बोरसे (वय ४५) रा. इंदिरानगर, जळगाव खुर्द याच्याविरुद्ध दारुबंदी कायदा, झोपडपट्टी दादा, हातभट्टी दारु विक्री, औषधी द्रव्य विषयक धोकादायक गुन्हेगार म्हणून गुन्हे आहेत. त्याची रवानगी मुंबईतील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

महिलेवरही कारवाई

रामानंद पोलिस ठाण्याअंतर्गत छायाबाई रमेश सकट (वय ५८) रा. राजीव गांधीनगर, जळगाव या महिलेविरुद्धही झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, याअंतर्गत गुन्हे दाखल असून धोकादायक व्यक्ती म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करुन अकोला येथील कारागृहात या महिलेची रवानगी करण्यात आली आहे. अन्य कारवाईत चोपडा येथील भैया मंगल पाटील (वय ३०) रा. अरुणनगर, चोपडा याच्यावर झोपडपट्टी दादा, हातभट्टी विक्री, विनापरवाना व्हीडीओ पायरसी असे गुन्हे दाखल आहेत. त्यालाही ताब्यात घेऊन नागपूर कारागृहात करण्यात आली आहे.

यांच्या पथकाकडून कारवाई

यासंबंधी कारवाईचे प्रस्ताव पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी, अतिरिक्त अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगावच्या अतिरिक्त अधीक्षक विता नेरकर यांच्यासह पोलिस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे, संदीप गावीत, कृष्णा पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखा वरिष्ठ निरीक्षक किशन नजन पाटील यांनी पाठवून मंजूर करण्यात आले.

Crime
Crime News: गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणास पोलिसांनी केली अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com