जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Jalgaon Gas Tanker Fire : धडकेनंतर केमिकल टँकरने क्षणात पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत टँकरचा चालक आणि क्लिनर यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे.
Jalgaon Gas Tanker Fire

Jalgaon Gas Tanker Fire

esakal

Updated on

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील सबगव्हाण टोलनाक्याजवळ शनिवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या केमिकल टँकरने टोल भरण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर केमिकल टँकरने क्षणात पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत टँकरचा चालक आणि क्लिनर यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com