Jalgaon Police : कर्मचारी, अधिकाऱ्यांना 2 वेळेची हजेरी सक्तीची; जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सोडले फर्मान

Jalgaon Police : जिल्‍हा पोलिस दलाच्या मुख्यालयांतर्गत ड्यूटीवर असणारे पोलिस अंमलदार, राखीव निरीक्षक अंतर्गत शाखांमध्ये कार्यरत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन वेळेची हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे.
Police
Police esakal

Jalgaon Police : जिल्‍हा पोलिस दलाच्या मुख्यालयांतर्गत ड्यूटीवर असणारे पोलिस अंमलदार, राखीव निरीक्षक अंतर्गत शाखांमध्ये कार्यरत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन वेळेची हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने मुख्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना हजेरीचे फर्मान सोडण्यात आले आहे. पोलिस मुख्यालयांतर्गत सातशेवर पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. अगदी वरिष्ठ अधिकारी, आमदार खासदारांच्या सुरक्षेपासून ते मुख्यालयातील विविध कामे आणि जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर सोपविली जाते. (Police Compulsory attendance of 2 times for employees and officers )

आणीबाणीप्रसंगी थेट कायदा व सुव्यवस्थेसाठी या कर्मचाऱ्यांना राखीव ठेवण्यात येते. असे असताना, आपल्या पसंतीच्या जागी नियुक्ती न मिळणारे, आजारग्रस्त, खाते अंतर्गत चौकशीत निलंबित, विभागीय कारवाई झालेले अधिकारी, कर्मचारी पोलिस मुख्यालयाशी संलग्न करण्यात येतात. इंग्रज शासन काळापासून मुख्यालय म्हणजे संपूर्ण खात्याची राखीव शक्ती समजली जाते. दिवसातून दोन वेळा चेक रोल, कवायती आणि पदानुसार कामे व जबाबदारी देऊन कामे करवून घेतली जात होती. (latest marathi news)

Police
Jalgaon Police Transfer : जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

आता जिल्‍हा पोलिस दलातील काही कर्मचारी व्यक्तिगत कामांकडे अधिक लक्ष देत असल्याने त्यांनी नोकरी केवळ नावापुरती ठेवली असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये तत्कालीन पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या सूचनेवरून तब्बल १२६ कामचुकार पोलिस कर्मचारी शोधून काढले होते. या सर्व कर्मचाऱ्यांना सकाळी नऊ आणि सायंकाळी सातला हजेरी लावली होती.

दोन वेळेस हजेरीची सूचना

पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार २ जुलैपासून मुख्यालय, तसेच विविध शाखांमध्ये कार्यरत पोलिस अधिकारी व अंमलदार (कर्तव्यावर असलेल्यांव्यतिरिक्त) यांनी रोज सकाळी नऊला हजेरीसाठी हजर राहावे, तसेच राखीव पोलिस अंमलदारांनी सायंकाळी सातला रोल कॉलवर हजर राहावे लागणार आहे.

Police
Jalgaon Police Transfer : पोलिस ठाण्यांना तपासी अंमलदारांची कमतरता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com