Crime
Crimeesakal

Jalgaon Crime News : मेहुणबारे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुगार अड्ड्यांवर छापे

Jalgaon Crime : चाळीसगाव शहरात सध्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी टाच आणल्यामुळे शहरातील क्लब चालकांनी ग्रामीण भागात अवैध धंदे सुरु केले आहेत.

Jalgaon Crime News : चाळीसगाव शहरात सध्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी टाच आणल्यामुळे शहरातील क्लब चालकांनी ग्रामीण भागात अवैध धंदे सुरु केले आहेत. गावातील चाळीसगाव- मालेगाव रस्त्यावरील पिलखोड गावाजवळ हॉटेलच्या मागे अड्ड्यावर येथील पोलिसांनी छापा टाकून झन्ना मन्ना जुगार खेळणाऱ्या दहा जणांना अटक केली.

त्यांच्याकडून २ हजार ७८० रुपयांचा ऐवज जप्त केला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Raids on gambling dens in Mehunbare police station limits)

Crime
Bhandara Crime: भर दुपारी घरात घुसून आई-मुलीवर युवकाचा चाकूहल्ला! प्रेमप्रकरणाची चर्चा; दोघीही जखमी

पिलखोड- मालेगाव रस्‍त्यावरील मानस हॉटेलच्या पाठीमागे झुडपाच्या आडोश्याला काही जण झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी यांना मिळाली. त्यांच्यासह त्यांचे कर्मचारी नीलेश लोहार, सुदर्शन घुले, भूषण बाविस्कर यांनी शुक्रवारी (ता. २९) अचानक जाऊन छापा टाकला असता.

जुगारी मांग पत्यावर झन्नामन्ना नावाचा जुगार खेलताना मिळून आले. पोलिसांनी महेंद्र दादाजी खैरनार, मंगेश भिमराव खैरनार, संभाजी चिंधा खैरनार, छोटू त्र्यंबक मोरे, भिकन नथ्थू देसले, बापू रामदास मगर.

दगा वामन अहिरे, गणेश पितांबर देसले (सर्व रा. कळवाडी, ता. मालेगाव) विजय भानुदास मांडोळे (रा. चिंचगव्हाण), संजय पितांबर मगर (रा. साकूर, ता. मालेगाव) या दहा जणांना ताब्यात घेतले. या सर्वांच्या विरोधात नीलेश लोहार यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे. (latest marathi news)

Crime
Nagpur Crime: लग्न मोडण्यासाठी गेटवर बॉम्ब लावणाऱ्याची सुटका, पोलीस कोठडीसाठी पोलिसांची न्यायालयात धाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com