Jalgaon Rain Update : जिल्ह्यात 40 टक्के पाउस! दिवसभरात सकाळी जोरदार, मध्यम अन्‌ उन्हाचा अनुभव

Jalgaon News : सोमवारी (ता. ८) सकाळी भुसावळ परिसरात धुॅंव्वाधार पाऊस झाला. जळगाव शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
Due to the ongoing rains, the crops in the fields and water accumulated in the fields.
Due to the ongoing rains, the crops in the fields and water accumulated in the fields.esakal
Updated on

Jalgaon Rain Update : जिल्ह्यात तीन दिवसांपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. जून बहुतांश कोरडा गेला. जून, जुलै महिने मिळून ४० टक्के पाऊस झाला आहे. रविवारी (ता. ७) मध्यरात्रीपासून शहरासह जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू होती.

सोमवारी (ता. ८) सकाळी भुसावळ परिसरात धुॅंव्वाधार पाऊस झाला. जळगाव शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दुपारी चक्क ऊन पडले होते. सकाळी धुॅंव्वाधार, नंतर मध्यम अन्‌ कडक ऊन, असे चित्र सोमवारी दिवसभर पाहायला मिळाले. (Jalgaon Update 40 percent rain)

जिल्ह्यात खरिपाच्या सुमारे ८५.५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यात कापशीचे सर्वाधिक ९३ टक्क्यांवर पेरणी झाली आहे. २३ जूनपर्यंत पावसाने ओढ दिली होती. कोणत्या तालुक्यात हलक्या किंवा मध्यम स्वरूपाचा पाउस पडला होता, तर काही ठिकाणी पाऊस पडलाच नव्हता. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. तीन दिवसांपासून अधूनमधून दमदार पाऊस झाला. यामुळे पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. (latest marathi news)

Due to the ongoing rains, the crops in the fields and water accumulated in the fields.
Rain Update: पुन्हा पावसाला सुरूवात; मुंबईसह राज्यासह या भागात 'रेड अलर्ट', हवामान विभागाने दिला सर्तकतेचा इशारा

जिल्ह्यात आतापर्यंत झालेला तालुकानिहाय पाऊस (टक्केवारीत)

जळगाव- ४१.६

भुसावळ- ३६.६

यावल-३५.१

रावेर-२२.७

मुक्ताईनगर-३३.१

अमळनेर-४०.९

चोपडा-२८.०

एरंडोल-३३.३

पारोळा-२६.२

चाळीसगाव-२९.६

जामनेर-३२.०

पाचोरा-३५.८

भडगाव-३७.५

धरणगाव-२७.९

बोदवड-३३.७

एकूण-४०.१ टक्के

"जिल्ह्यात चांगला पाऊस सुरू आहे. सर्वाधिक पेरा कापसाचा शेतकऱ्यांनी केला आहे. आतापर्यंत ८५.५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. लवकरच शंभर टक्के पेरण्या पूर्ण होतील."

-कुर्बान तडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Due to the ongoing rains, the crops in the fields and water accumulated in the fields.
MH Rain Update: मुंबईसह 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट, 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; कुठे शाळा बंद? तुमच्या जिल्ह्याची स्थिती जाणून घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.