Jalgaon Lok Sabha Election 2024 Result : भाजपचा बालेकिल्ला शाबूत, खडसे नावाचे ‘वलय’ कायम!

Lok Sabha Election : भाजपमधील कथित अंतर्गत नाराजी अशा कारणांमुळे रावेरची भाजपची ‘सीट’ धोक्यात असल्याचा बागुलबुवा उभा करण्यात आला.
Raksha Khadse
Raksha Khadseesakal

Jalgaon Lok Sabha Election 2024 Result : मराठा- मुस्लिम मतांचे समीकरण, भाजपमधील कथित अंतर्गत नाराजी अशा कारणांमुळे रावेरची भाजपची ‘सीट’ धोक्यात असल्याचा बागुलबुवा उभा करण्यात आला. काहीअंशी तशी स्थिती होती. मात्र, भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात ‘खडसे’ नावाचे वलय कायम राहिले आहे. एकनाथ खडसेंनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये वापसीची घेतलेली भूमिका रक्षा खडसेंना विजयाची ‘हॅट्‌ट्रिक’ मिळवून देण्यात यशस्वी ठरली आहे. ( Raksha Khadse return to BJP in run up to elections has been successful in getting hat trick of victory )

लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या जवळपास दोन महिने आधी रक्षा खडसेंना उमेदवारी मिळेल की नाही, याची शाश्‍वती नव्हती. मात्र, २०२० मध्ये त्यांचे सासरे एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरही रक्षा खडसे पक्षाशी एकनिष्ठ राहिल्या. एवढेच नव्हे; तर मतदारसंघात त्यांनी संपर्क कायम ठेवला. पक्षाने उमेदवारी दिली नाही, तरी कार्यकर्ता म्हणून भाजपतच राहण्याची भूमिकाही त्यांनी वेळोवेळी मांडली. त्याचेच फलित म्हणून त्यांना पक्षाने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली.

खडसेंचीही ‘घरवापसी’

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसेंनी भाजपत परतण्याची भूमिका घेतली. त्यांचा पक्षप्रवेश निश्‍चित असताना राज्यातील नेतृत्वाच्या नाराजीमुळे तो रखडला असला तरीही, खडसेंनी सुनेच्या प्रचारात स्वत:ला झोकून दिले. रावेर लोकसभा क्षेत्र हे भाजपचा बालेकिल्ला मानले जाते. या संपूर्ण मतदारसंघात खडसेंचेही वर्चस्व आहे. त्या वर्चस्वाचा लाभ रक्षा खडसेंना झालेला दिसतो.

जातीय समीकरण झुगारले

मुळात रावेर मतदारसंघात भाजपकडून रक्षा खडसेंची उमेदवारी फार आधी जाहीर झाली. मात्र, पक्षातूनच त्यांच्या उमेदवारीला विरोध झाला. गिरीश महाजनांसह पक्ष नेतृत्वाने पक्षांतर्गत नाराजी दूर केल्यानंतर प्रत्यक्ष प्रचार सुरु झाला. रक्षा खडसे व भाजपने मोदी सरकारच्या गेल्या दहा वर्षांतील कामगिरीवर प्रचाराचा ‘फोकस’ केला. तुलनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटलांची उमेदवारी ऐनवेळी जाहीर झाली. (latest marathi news)

Raksha Khadse
Jalgaon Lok Sabha Election : जळगावसाठी 25, रावेरसाठी मतमोजणीच्या 24 फेऱ्या; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून पाहणी

त्यांना प्रचाराला वेळही कमी मिळाला. मात्र श्रीराम पाटलांकडून स्थानिक मुद्यांवर प्रचार केला गेला. शिवाय, मराठा- मुस्लिम- दलित मतांचे समीकरणही पुढे करण्यात आले. त्याआधारे श्रीराम पाटलांच्या विजयाचे आराखडे विविध सोशल मीडिया ग्रुपमधून व्हायरलही करण्यात आले. मात्र, रावेरच्या सुज्ञ मतदारांनी पुन्हा एकदा जाती-पातीच्या राजकारणाला झुगारुन लावल्याचे निकालावरुन दिसून येते.

भाजपचे सूक्ष्मनियोजनही कामी

रावेर मतदारसंघात गेल्या तीस वर्षांपासून (१९९८-९९ चा अपवाद वगळता) भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. रक्षा खडसेंनी सलग तिसऱ्यांदा तीन लाखांचे मताधिक्य घेऊन दणदणीत विजय मिळविला. खडसेंच्या पाठबळाचे हे फलित असले तर या मतदारसंघात किंबहुना जळगाव जिल्ह्यातच भाजपचे ‘केडर’ मजबूत असून त्याद्वारे बुथरचनेच्या सूक्ष्म नियोजनामुळेही रावेरमध्ये हॅट्‌ट्रिक साधण्यात रक्षा खडसेंना यश मिळाल्याचे दिसून येते.

गेल्या वेळी रक्षा खडसेंना तीन लाखांहून अधिक मताधिक्य होते. २०१४ व २०१९ ला मोदी लाटेत मताधिक्य वाढल्याचे त्या वेळी मानले गेले. यंदा मोदी लाट नसताना तीन लाखांहून अधिक मताधिक्य राखता आले नसले तरी जवळपास तेवढ्या मताधिक्यापर्यंत रक्षा खडसेंना पोहोचविण्याचे काम एकनाथ खडसेंमुळे सोपे झाले, असेच म्हणावे लागेल.

Raksha Khadse
Jalgaon Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या उंचावलेल्या प्रतिमेसह मोदींच्या विकासकामांना कौल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com