Jalgaon News : बऱ्हाणपूर- तळोदा महामार्ग रावेरमधूनच : रक्षा खडसे

Jalgaon : राष्ट्रीय महामार्ग रावेर शहरासह भोकरी, कर्जोद, खानापूर, चोरवड या ऐवजी मुक्ताईनगर तालुक्यातून जाणार असल्याचे राजपत्र प्रसिद्ध झाले आहे.
Raksha Khadse
Raksha Khadseesakal

Jalgaon News : केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाने २९ फेब्रुवारीला प्रसिद्ध केलेल्या राजपत्रातील मजकूर जुना आहे, मुक्ताईनगर तालुक्यातून जाणाऱ्या या नियोजित राष्ट्रीय महामार्गाची सर्वेक्षणासह सर्वच कामे थांबविण्याचे निर्देश भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने दिले आहेत. लवकरच सावदा व रावेर शहरासह तालुक्याच्या पूर्व भागातून जाणाऱ्या या नियोजित राष्ट्रीय महामार्गाचे सर्वेक्षण सुरू होईल. असे खासदार रक्षा खडसे यांनी 'सकाळ'ला सांगितले. (Jalgaon Raksha Khadse statement Berhanpur Taloda National Highway will pass through Raver)

हा राष्ट्रीय महामार्ग रावेर शहरासह भोकरी, कर्जोद, खानापूर, चोरवड या ऐवजी मुक्ताईनगर तालुक्यातून जाणार असल्याचे राजपत्र प्रसिद्ध झाले आहे. त्याविषयी आज सकाळने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

रावेर मधून जाईलच कसा ?

खासदार खडसे यांनी सकाळशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या ५ जानेवारी २०२४ ला जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदीच्या बैठकीत नियोजित मार्गाबद्दल नाराजी व्यक्त झाली.

हा राष्ट्रीय महामार्ग मुक्ताईनगर मार्गे न नेता रावेर शहरासह पूर्व भागातूनच न्यावा असा निर्णय झाला आहे. असे असताना हा मार्ग मुक्ताईनगर तालुक्यातून आता कसा जाईल ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ( न्हाई ) ने २३ जानेवारी २०२४ ला मुक्ताईनगर तालुक्यातील सर्वेक्षणाचे काम थांबवावे असे निर्देश के अँड जे प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर या खाजगी संस्थेला दिले आहेत.

Raksha Khadse
Jalgaon News : अवैद्य गॅस किट वाहनविरोधात मोहीम; 5 वाहनांना सव्वा लाख रुपये दंड

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच काम पुन्हा सुरू करण्याचे निर्देश पत्रात आहेत. लोकप्रतिनिधी व जनतेचा विरोध लक्षात घेऊन हा राष्ट्रीय महामार्ग मुक्ताईनगर मार्गे नेण्याच्या सर्वच कृती थांबविण्याचे निर्देश पत्रात देण्यात आले असून हा महामार्ग रावेर शहराजवळून नेण्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे.

आपण या विभागाच्या कायमच संपर्कात असून नुकतेच प्रसारमाध्यमांवर फिरत असलेल्या राजपत्रातील मजकूर आधीचा असून तारीख नंतरची टाकली गेली असल्याचेही त्यांनी सांगितले. कोणत्याही राष्ट्रीय महामार्गाचे काम निश्चित होण्यापूर्वी केंद्र सरकारकडून ३- अ ची नोटीस काढण्यात येते. तोपर्यंत कोणताही आदेश अंतिम मानण्यात येत नाही.

प्रकल्प संचालकांबद्दल नाराजी

या राष्ट्रीय महामार्गासंदर्भात अशी कोणतीही नोटीस अजून आली नसल्याने हा राष्ट्रीय महामार्ग रावेर शहराजवळून व तालुक्याच्या पूर्व भागातूनच जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या राजमार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजी पवार यांच्या कार्यशैलीबद्दलही खासदार खडसे यांनी नाराजी व्यक्त केली…

Raksha Khadse
Jalgaon News : हुकूमशहा मोदीविरोधात ताकदीने सामना करा : उध्दव ठाकरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com