Jalgaon News : अवैद्य गॅस किट वाहनविरोधात मोहीम; 5 वाहनांना सव्वा लाख रुपये दंड

Jalgaon : पारोळा बस स्थानक परिसरात घरगुती गॅसचा कार साठी वापरा दरम्यान कार जळाल्याची घटना घडल्यानंतर सर्तक झालेल्या पोलिसांनी आज खासगी वाहनांविरोधात मोहीम राबविली.
Gas kit Omni seized from police station premises
Gas kit Omni seized from police station premisesesakal

Jalgaon News : पारोळा बस स्थानक परिसरात घरगुती गॅसचा कार साठी वापरा दरम्यान कार जळाल्याची घटना घडल्यानंतर सर्तक झालेल्या पोलिसांनी आज खासगी वाहनांविरोधात मोहीम राबविली. अवैध गॅस किट वापरणाऱ्या वाहनावर कारवाई करीत, सुमारे सव्वा लाखांचा दंड वसूल केला.

सोबतच पोलिसांनी आज खाजगी वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या पाच वाहना विरोधातही कारवाई करत दंड आकारणी केली. (Jalgaon Campaign against Unaided Gas Kit Vehicle 5 vehicles with a fine)

पारोळा येथे भर वस्तीत गॅस भरताना ओमिनी कार जळून खाक झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस ॲक्शन मोडवर उतरलेले दिसले. दुपारी बस स्थानक परिसरात पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या उपस्थितीत पोलीस कॉन्स्टेबल दीपक अहिरे.

भूषण पाटील, उप प्रादेशिक परिवहन विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश पिंगळे यांनी पारोळा तालुक्यात अवैद्यरित्या प्रवासी वाहतूक करताना आढळून आलेल्या वाहनांवर कार्यवाही केली त्यात दिवसभरात एकूण पाच ओमिनी वाहनांवर कारवाई केली. सर्व वाहने पारोळा पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आलेली आहे.

Gas kit Omni seized from police station premises
Jalgaon News : विद्यार्थ्यांना इंटर्नशिपतून अनुभव प्रदान करा : जिल्हाधिकारी

जप्त केलेल्या गॅस किट ओम्नी कंसात दंड

एमएच १९ एएक्स ५१८२ (२६५००)

एमएच १८ डब्लू १५६८ ( २७०००)

एमएच १५ सिडी ८०५४ (२३०००)

एमएच १२ एफके ७७९० (२३०००)

एमएच ४३ एन ८१३३ (२९०००) -

Gas kit Omni seized from police station premises
Jalgaon News : शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवार आज ठरणार; जळगाव लोकसभा

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com