Jalgaon Ramdev Wadi Accident : आतापर्यंतच्या पोलिस तपासावरच संशय : एकनाथ खडसे

Ramdev Wadi Accident : रामदेववाडी अपघात प्रकरणात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मंगळवारी (ता. २८) पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेतली.
Eknath Khadse
Eknath Khadse esakal
Updated on

Jalgaon Ramdev Wadi Accident : रामदेववाडी अपघात प्रकरणात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मंगळवारी (ता. २८) पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेतली. अपघातात आणखी संशयितांच्या समावेशासह पोलिसांच्या तपासावरच श्री. खडसे यांनी संशय व्यक्त करून उच्‍चस्तरीय तपासाची मागणी केली. जळगाव-पाचोरा रोडवरील रामदेववाडीजवळ ७ मेस सुसाट कारने दुचाकीला धडक दिल्याने आईसह दोन मुलांचा व भाचा, असा चौघांचा मृत्यू झाला होता. (Eknath Khadse statement of Suspicion on police investigation so far)

पोलिसांनी तब्बल १७ दिवस कुठलीच कारवाई राजकीय दबावापोटी केली नाही. पुण्याची घटना घडल्यानंतर आपण स्वतः या प्रकरणात २० मेस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, वरिष्ठ पोलिस अधीकारी रश्मी शुक्ला यांच्याशी बोलणे करून आंदोलनाचा इशारा दिल्यावर अखिलेश संजय पवार व अर्णव अभिषेक कौल यांना २३ मेस मुंबईतून ताब्यात घेतले, तर त्यांचा मित्र ध्रुव नीलेश सोनवणे याला शनिवार (ता. २५) अटक केली होती. या तिघा संशयितांची कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.

रक्ताच्या नमुन्यात ‘झोल’

संशयित अर्णव कौल मंत्री अनिल भाईदास पाटील यांचे निकटवर्तीय अभिषेक कौल यांचा मुलगा, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्‍हाध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा अखिलेश पवार यांच्यापैकी अखिलेश पवारला किरकोळ मार लागला असताना, त्याला मुंबईला हलवण्यात आले. संशयितांचे ब्लड सॅम्पल जळगावला न घेता सहा तासांनी पारोळा येथे घेण्यात आले. उशिराने ब्लड सॅम्पल घेतल्याने त्यात अंमली पदार्थाचा अंमल येण्याची शक्यता कमी आहे. हे सर्व पोलिसांनी संशयितांना वाचविण्यासाठी केल्याचा आरोप श्री. खडसे यांनी केला. (latest marathi news)

Eknath Khadse
Ramdev Wadi Accident Case : पुण्याचे ‘हिट’ जळगावचे ‘रन’! 15 दिवसांनंतर मुंबईतून दोघे संशयित ताब्यात!

मोबाईलचा सीडीआर मिळावा

राज्य सरकारने ज्याप्रमाणे या गुन्ह्याला गांभीर्याने घेणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे अद्यापही घेतलेले नाही. रामदेववाडी अपघात प्रकरण पुण्यातील घटनेपेक्षाही गंभीर असून, या प्रकरणात पोलिस राजकीय दबावाखाली काम करीत आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह या गुन्ह्याशी निगडित पोलिस अधिकारी व संशयितांच्या नातेवाइकांचा मोबाईलचे सीडीआर तपासावेत. त्यातून नेमका कुणाचा दबाव होता, हे उघड होईल.

इतर संशयितांचे काय?

या गुन्ह्यात आणखी एक कार असल्याची माहिती आपण पोलिस अधीक्षकांना दिली. एका जबाबदार नेत्याने ही माहिती मला दिली असून, त्याच्याशी आपण पोलिस अधीक्षकांचे बोलणे करून दिले. यात एका तरुणीसह इतर दोन संशयितांचा समावेश असल्याचे समोर येत असल्याचेही श्री. खडसे यांनी सांगितले.

‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी

राजकीय दबावाखाली काम करणाऱ्या त्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी श्री. खडसे यांनी या वेळी केली.

Eknath Khadse
Jalgaon Ramdev Wadi Accident Case: रामदेववाडी हिट ॲन्ड रन.. चौघांचा बळी अन्‌ संवेदनाशून्य यंत्रणा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com