Raver Lok Sabha Constituency : खडसे- पाटील कट्टर विरोधक, मनोमिलन कसे होणार? मुक्ताईनगरातील स्थिती

Jalgaon News : रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपने जाहीर केलेल्या रक्षा खडसेंच्या उमेदवारीला सर्वांत जास्त विरोध होत आहे तो मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा.
Eknath Khadse, Raksha Khadse, Chandrakant Patil
Eknath Khadse, Raksha Khadse, Chandrakant Patilesakal

Jalgaon News : रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपने जाहीर केलेल्या रक्षा खडसेंच्या उमेदवारीला सर्वांत जास्त विरोध होत आहे तो मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा. खडसे- पाटील हे या भागातील कट्टर विरोधक. त्यामुळे त्यांच्यात मनोमिलन कसे होणार हा प्रश्‍नच आहे. त्यामुळे युतीच्या बैठकांमधून पाटलांनी खडसेंबद्दल कितीही तक्रारी केल्या, विरोध दर्शविला तरी त्या निरर्थक ठरण्याचीच शक्यता जास्त आहे. (Jalgaon Raver Lok Sabha constituency)

रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपने सलग तिसऱ्यांदा रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली. पक्षांतर्गत विरोधक त्यामुळे नाराज झाले, त्यांनी राजीनामे देऊ केले. मात्र, मंत्री गिरीश महाजनांनी त्यांची समजूत काढत विषय संपवला. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मात्र रक्षा खडसेंच्या उमेदवारीबद्दल विरोधाचा सूर कायम ठेवला आहे. याचदरम्यान ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या भाजपतील वापसीच्या हालचालीही गतिमान झाल्या.

त्यांनी स्वत:च भाजपत येत असल्याचे जाहीर केल्यामुळे आमदार चंदक्रांत पाटलांची मोठी गोची झाली. कारण, खडसे व पाटलांमध्ये या मतदारसंघातील वैर सर्वश्रुत आहे. महायुतीच्या उमेदवार असल्या तरी खडसेंच्या स्नुषा असल्याने रक्षा खडसेंचा प्रचार कसा करणार, हा पाटलांसमोरचा प्रश्‍न. तर महायुती असल्याने प्रचार करणे पाटलांचे कर्तव्य आहे, असा रक्षा खडसेंचा दावा. त्यांच्या याच भूमिकेचे पडसाद महायुतीच्या बैठकांमधून उमटत आहेत.

खडसे- पाटील नेमका वाद काय?

एकनाथ खडसे- चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद आजचा नाही. त्याला दोन दशकांची पार्श्‍वभूमी आहे. खडसे हे १९८० पासून राजकारणात सक्रिय आहेत. वि.का. सोसायटीचे चेअरमन, कोथळीचे सरपंच, आमदार, मंत्री अशी त्यांची राजकीय वाटचाल. चंदक्रांत पाटील तुलनेने उशिरा, म्हणजे १९९५ नंतर राजकारणात सक्रिय झाले.

सुरवातीला ते विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख होते. नंतर २००४ च्या सुमारास शिवसेनेचे तालुकाप्रमुख आणि नंतर जिल्हा प्रमुख झाले. २००१मध्ये मुक्ताईच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन तत्कालिन सूचना व प्रसारण मंत्री प्रमोद महाजनांच्या हस्ते झाले. (latest marathi news)

Eknath Khadse, Raksha Khadse, Chandrakant Patil
Jalgaon Loksabha Election 2024 : भाजपच्या उमेदवारीवरुन आदळआपट.. महायुतीत मिठाचा खडा!

त्याचदरम्यान पाटील समर्थक व भाजप कार्यकर्त्यांत वाद होऊन या तिकिटाच्या फलकाची विटंबना करण्यात आली. तेव्हापासून खडसे- पाटील यांच्यात वाद सुरु झाला. पुढे पाटील जि.प. सदस्य झाले. मात्र तिसरे अपत्यप्रकरणी भाजपच्या तक्रारीवर ते अपात्र झाले.

२००४च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी युती असतानाही खडसेंविरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार ॲड. रवींद्र पाटील यांना मदत केली. २०१४ ला भाजप- सेना स्वतंत्र लढले, तेव्हा खडसेंनी पाटलांचा साडेनऊ हजार मतांनी पराभव केला. तेव्हाही पाटील कॉंग्रेस- सेनेचे संयुक्त उमेदवार होते व राष्ट्रवादीनेही त्यांना ऐनवेळी पाठिंबा दिला होता.

२०१९ ला पुन्हा युती झाली. पण, पाटील अपक्ष लढले व अवघ्या १८०० मतांनी विजयी झाले. या वेळीही त्यांना कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंबा दिला. २००४, २००९, २०१४ व २०१९ अशा प्रत्येक लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील युतीचे घटक होते, तरी त्यांनी खडसेंच्या व पर्यायाने भाजपच्या विरोधातच भूमिका घेतलीय, हे लपून राहिलेले नाही. काळ लोटत गेला, तरी खडसे- पाटील यांच्यातील वाद शमला तर नाहीच, उलट वाढत गेला.

रक्षा खडसे पाटलांना विधानसभेला मदत करतील?

मंगळवारी रात्री भाजप कार्यालयात झालेल्या महायुतीच्या बैठकीत मुक्ताईनगरातील या वादाचा मुद्दा उपस्थित होणे स्वाभाविक होते. चंद्रकांत पाटील या बैठकीला नव्हते, तरीही त्यांच्या वतीने हा मुद्दा उपस्थित झाला. खडसे भाजपत येताय, रोहिणी खडसे पवारांसोबतच असतील.

Eknath Khadse, Raksha Khadse, Chandrakant Patil
Loksabha election 2024 : मासे खातानाच्या व्हिडीओवरुन तेजस्वी यादवांना घेरण्याचा प्रयत्न; Video Viral

मग, विधानसभा निवडणुकीच्या वेळी रोहिणी राष्ट्रवादीच्या उमेदवार राहिल्या, तर खासदार रक्षा खडसे चंद्रकांत पाटलांना मदत करतील काय असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. रक्षा खडसेंनी महायुतीच्याच उमेदवाराचे काम करु, असे स्पष्ट केले.

मग, खडसेंच्या विरोधात उचापती का?

एकीकडे चंद्रकांत पाटील महायुतीचा घटक असूनही भाजप व पर्यायाने महायुतीच्या उमेदवार म्हणून रक्षा खडसेंना विरोध करतात. चंद्रकांत पाटलांची बाजू लावून धरत बैठकीत रक्षा खडसेंना शिवसेना नेते जाब विचारतात. आणि दुसरीकडे पाटील मात्र रक्षा खडसेंच्या विरोधात उचापती करताना दिसतात.

गौण खनिज उत्खनन प्रकरणी महसूल विभागाने खडसे कुटुंबियांना १३७ कोटींचा दंड ठोठावला. त्यात रक्षा खडसेंचेही नाव आहे. या दंडाच्या कारवाईला शासनाने स्थगिती दिल्यानंतर त्यालाच पाटलांनी खंडपीठात आव्हान दिले. मग, असे असताना त्यांना रक्षा खडसे विधानसभेला मदत करतील काय असे विचारणे हास्यास्पद ठरते..

Eknath Khadse, Raksha Khadse, Chandrakant Patil
Jalgaon Loksabha: स्मिता वाघांच्या विरोधात ठाकरेंनी मैदानात उतरवलेल्या करण पवारांची ताकद किती?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com